
फोटो सौजन्य - Social Media
डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी पेटीएमने आज एआय (Artificial Intelligence) आधारित नवीन ट्रॅव्हल अॅप ‘पेटीएम चेकइन’ सादर केले आहे. या अॅपद्वारे प्रवासाचे नियोजन, बुकिंग आणि प्रवासाचा संपूर्ण अनुभव अधिक बुद्धिमान आणि संवादात्मक होणार आहे. (Paytm) एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पेटीएमने प्रवास क्षेत्रात एक नवीन युग सुरू केल्याचे मानले जात आहे. ‘पेटीएम चेकइन’ अॅपमधील एआय सहाय्यक वापरकर्त्यांच्या संवादावर आधारित काम करतो. वापरकर्त्यांच्या प्रश्नांना तो सहजपणे समजतो आणि त्यांच्या आवडीनुसार फ्लाइट, ट्रेन, बस आणि मेट्रो बुकिंगसाठी अचूक सुचना देतो. तसेच, मागील प्रवासाचा इतिहास, बजेट आणि पसंतीच्या ठिकाणांवर आधारित वैयक्तिक शिफारसीही करतो. हे अॅप सध्या बीटा टप्प्यात असून, वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार त्यामध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येणार आहे.
पेटीएमच्या इनोव्हेशन आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोनावर आधारित हे अॅप वापरकर्त्यांना सुलभ, पारदर्शक आणि लवचिक प्रवास अनुभव देण्यावर भर देते. अॅपवर शून्य कंव्हिनियन्स फी आहे. फ्लाइट बुकिंगसाठी फक्त ₹९९ मध्ये फ्री कॅन्सलेशन आणि ₹२४९ मध्ये ट्रॅव्हल पास या माध्यमातून विशेष बचतीची सुविधा दिली आहे. तसेच, ‘Paytm Assured for Buses’ स्कीमअंतर्गत वेळेवर परतावा दिला जातो, तर ‘Ticket Assure for Trains’ प्रवासादरम्यान कन्फर्म सीट मिळविण्यास मदत करते.
या अॅपमध्ये आधुनिक आणि वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस, जलद चेकआऊट प्रक्रिया आणि पारदर्शक किंमत रचना उपलब्ध आहे. रीअल-टाइम फ्लाइट ट्रॅकिंगसारख्या फीचर्समुळे प्रवास नियोजन अधिक सुलभ आणि अनुभव अधिक सुरळीत बनतो. पेटीएमचा विश्वास आहे की एआयच्या साहाय्याने पारंपरिक शोधप्रक्रियेतून संवादात्मक नियोजनाकडे प्रवासाचे रूपांतर होईल. यामुळे प्रवास अधिक वेगवान, वैयक्तिक आणि बुद्धिमान होणार आहे.
पेटीएमचे ट्रॅव्हल विभागाचे सीईओ विकाश जालान यांनी सांगितले, “पेटीएम चेकइन हे एआय संचालित प्रवासाच्या दिशेने आमचे मोठे पाऊल आहे. हे लोकांसाठी प्रवास नियोजन आणि बुकिंग करण्याचा अधिक स्मार्ट आणि सोपा मार्ग ठरेल. आम्हाला विश्वास आहे की एआय प्रवास नियोजनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवेल.”
भारतातील मोबाइल पेमेंट्स क्षेत्रातील पायोनियर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेटीएमने आता विविध क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून अधिक वैयक्तिक आणि कार्यक्षम अनुभव देण्यास सुरुवात केली आहे. ‘पेटीएम चेकइन’च्या माध्यमातून कंपनीने प्रवास क्षेत्रातही ही दृष्टी विस्तारली असून, प्रवासाचे नियोजन आणि बुकिंग आता अधिक स्मार्ट, सहज आणि पारदर्शक बनले आहे.