अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या फीचर्सवरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हा स्मार्टफोन बाजारात आधीपासूनच असलेल्या स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीच्या या आगामी फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, जो स्क्रॉलिंग आणि गेमिंगचा अनुभव अधिक चांगला करणार आहे. फिलिप्स 5जी स्मार्टफोन 6GB आणि 8GB रॅम ऑप्शनमध्ये लाँच केला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच, स्टोरेजसाठी या स्मार्टफोनमध्ये 128GB आणि 256GB पर्याय मिळणार आहेत. (फोटो सौजन्य: X)
ॲमेझॉनवरून समोर आलेल्या माहितीनुसार असा अंदाज लावला जात आहे की, कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन ब्लॅक, ग्रे आणि व्हाईट रंगांच्या पर्यायांत लाँच करू शकते. तसेच कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या कलर ऑप्शनची अधिकृत नावे देखील जाहिर केली नाही. फोनच्या रिअर पॅनलवर वरच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात वर आलेला कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळेल. कंपनीने अद्याप त्यांच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव अधिकृतपणे जाहिर केले नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन लिस्टिंगमध्ये हा स्मार्टफोन फिलिप्स S7221 नावाने स्पॉट करण्यात आला आहे.
फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेंसर व्हर्टिकल पद्धतीने सेट करण्यात आले आहेत आणि यासोबतच यामध्ये एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये गोलाकार कोपरे आणि खालील बाजूला फिलिप्सची ब्रँडिंग पाहायला मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला होल-पंच डिझाईनवाला डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याच्या चारही बाजूला पातळ बेजल्स पाहायला मिळत आहेत.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा AI-पावर्ड रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. आगामी डिव्हाईसमध्ये अधिक चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी डुअल स्टीरियो स्पीकर्स आणि अल्ट्रा मॅक्स ऑडिओचा सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय, या फोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली आहे.






