नवीन स्मार्टफोन खरेदी करायच्या विचारात आहात का? फ्लिपकार्टवर POCO C71 च्या विक्रीला झाली सुरूवात
हल्ली मार्केटमध्ये दमदार आणि आधुनिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स लाँच होत आहे. नुकताच POCO C71 हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच झाला होता. यामुळे 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत अल्टिमेट ब्लॉकबस्टरचा अनुभव घेण्याची संधी ग्राहकांसाठी आता उपलब्ध झाली आहे.
पोको C71 हा स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आला असून, ग्राहकांचा अनुभव एका नव्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी हा फोन तयार करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.88 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह वेट टच डिस्प्लेचा सपोर्ट आहे. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी ट्रिपल TÜV Rheinland सर्टिफिकेशनदेखील मिळाले आहे. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा आणि दमदार 5200 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. इतक्या प्रगत फीचर्ससह हा स्मार्टफोन अतिशय आकर्षक किमतीत फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
Instagram वर आता 16 वर्षांखालील युजर्संना ‘या’ गोष्टीवर बंदी, मेटाचा नवीन नियम लागू
POCO C71 चा 4GB रॅम + 64GB स्टोरेज असलेला मॉडेल केवळ ₹6,499 मध्ये उपलब्ध आहे, तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज असलेला पर्याय ₹7,499 मध्ये मिळतो. त्यामुळे फ्लॅगशिप लेव्हलची वैशिष्ट्ये आता अधिक किफायतशीर आणि सहजपणे मिळवता येणार आहेत.
सेगमेंटमधील सर्वात मोठा आणि स्मूद डिस्प्ले: हा फोन 6.88 इंच HD+ डिस्प्ले जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो, जे अतिशय स्मूद स्क्रोलिंग आणि गेमिंगसाठी चांगले आहे.
स्लीक आणि स्टायलिश डिझाइन: आकर्षक गोल्डन रिंग कॅमेरा डेको आणि स्प्लिट-ग्रिड डिझाइनमुळे फोनचा लूक उठून दिसतो. फक्त 8.26 मिमी जाडी आणि तीन स्टायलिश रंगांमध्ये (डेजर्ट गोल्ड, कूल ब्लू आणि पॉवर ब्लॅक) हा फोन उपलब्ध आहे.
Triple TUV सर्टिफिकेशन: अधिक सुरक्षित आणि आरामदायक स्क्रीन अनुभवासाठी ब्लू लाइट रिडक्शन, फ्लिकर-फ्री डिस्प्ले आणि लो मोशन ब्लर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
पॉवरफुल परफॉर्मन्स: 12GB डायनॅमिक RAM (6GB + 6GB व्हर्चुअल) आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरसह मल्टिटास्किंग अधिक सहजतेने होते.
दीर्घकाळ चालणारी बॅटरी: 5200mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंगच्या साहाय्याने तुम्हाला दिवसभर अखंडित वापराची हमी.
प्रो लेव्हल फोटोग्राफी: 32MP ड्युअल कॅमेरा, फिल्म फिल्टर्स आणि नाईट मोडसह प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला द्या प्रो फिनिश मिळते.
क्लीन आणि सुरक्षित Android 15 अनुभव: फ्युचर-रेडी वापरासाठी 2 मेजर Android अपडेट्स आणि 4 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.