मोबाईल कंपनी पोकेने त्यांचा नवीन फोन Poco F6 5G मागील आठवड्यातच लाँच केला होता आणि त्यात आता आज तो पहिल्यांदा सेलमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. सेल दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि ग्राहक फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. सेल बॅनरवरून असे समजले आहे की ग्राहक पोकोचा हा नवीनतम फोन 25,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत किंवा 2,166 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी करू शकतात. ही डील बँक ऑफर जोडल्यानंतरची आहे. ग्राहकांनी हे खरेदी करण्यासाठी ICICI बँक कार्ड वापरल्यास, तुम्हाला 2,000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. याशिवाय एक्स्चेंज ऑफरसह फोनवर 2,000 रुपयांची वेगळी सूटही मिळू शकते. चला तर आता जाणून घेऊयात या फोनचे धमाकेदार फीचर्स.
पोकोच्या नवीन फोनमध्ये 1.5K रिज्युलेशनवाला 6.67-इंच AMOLED डिस्प्ले मिळतो, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 446 ppi पिक्सेल डेंसिटी आहे. याचा डिस्प्ले HDR10+, Dolby Vision आणि Widevine L1 ला सपोर्ट करतो. हा फोन 2,400 nits ची पीक ब्राइटनेस देते आणि यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस सुरक्षा आहे. यासोबतच हा 12GB पर्यंत LPPDDR5x रॅमसह ऑक्टा-कोर 4nm स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेटवर चालतो.
पोको F6 5G हा भारतातील असा पहिला फोन आहे ज्यामध्ये स्नैपड्रैगन 8s Gen 3 प्रोसेसर आहे. जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हाय परफॉर्मन्स सुनिश्चित करतो. ड्युअल सिम (नॅनो) सह हा पोको F6 5G एंड्रॉयड 14 वर आधारित हायपर OS इंटरफेसवर काम करतो. पोको फोनसाठी तीन प्रमुख एंड्रॉयड अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्योरिटी पॅच प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे.
[read_also content=”निम्म्याहुनही कमी किमतीत मिळत आहेत हे ब्रँडेड इअरबड्स, अशी ऑफर पुन्हा कुठे… https://www.navarashtra.com/technology/branded-earbuds-are-available-at-less-than-half-price-where-else-can-you-find-such-an-offer-539568.html”]
फोनचा दमदार कॅमेरा
कॅमेराबद्दल बोलणे केले तर, पोको F6 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) आणि f/1.59 च्या सपोर्टसह 50-मेगापिक्सेल 1/1.9-इंचाचा Sony IMX882 सेन्सर आहे. यात 8-मेगापिक्सेलचा सोनी IMX355 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सेल OV20B फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. नवीन फोनमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी Poco चे IceLoop कूलिंग तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
पोको F6 5G फोनमध्ये 512GB UFS 4.0 स्टोरेज आहे. पोकोने ने Poco F6 5G मध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. ब्रँडने बॉक्सवर 120W एडाप्टर बंडल केले आहे. या फोनमध्ये Dolby Atmos सपोर्ट आणि Hi-Res सर्टिफिकेशनसह हायब्रिड ड्युअल स्टीरिओ स्पीकरदेखील आहेत.