फोटो सौजन्य - Narendra Modi X account
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मिडीया अॅप X वर 100 मिलीयन पूर्ण फॉलोवर्स झाले आहेत. भारतातील राजकारणात पंतप्रधान मोदी सर्वाधिक फॉलोवर्स असलेले नेते ठरले आहेत. गेल्या 3 वर्षांत मोदींची X वरील फॉलोवर्स लिस्ट 30 मिलीयनने वाढली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर 100 मिलीयन फॉलोवर्सचा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता राजकारणासह सोशल मिडीयावर देखील मोदींची लोकप्रियता वाढत आहे. YouTube आणि Instagram वर देखील मोदींची फॉलोवर्स लिस्ट फार मोठी आहे. YouTube वर मोदींचे सुमारे 25 मिलियन सब्सक्राइबर आहेत. तर Instagram पर 91 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्यामुळे मोदींची सोशल मिडीयावरील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
SpaceX चे सीईओ आणि X चे मालक Elon Musk यांचे X वर सर्वाधिक म्हणजे 189.7 मिलीयन फॉलोवर्स आहेत. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे X वर 131.7 मिलीयन फॉलोवर्स आहेत. Cristiano Ronaldo चे X वर 112. 1 मिलीयन फॉलोवर्स आहेत. कॅनेडियन गायक Justin Bieber X वर110. 5 मिलीयन फॉलोवर्स आहेत. Rihanna चे X वर 108.1 मिलीयन फॉलोवर्स आहेत आणि Katy Perry चे X वर 106.3 मिलीयन फॉलोवर्स आहेत. X वर 100 मिलीयन फॉलोवर्स असणाऱ्या यादीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देखील जोडले गेले आहे. टेलर स्विफ्ट चे X वर 95.3 मिलियन फॉलोवर्स , लेडी गागा चे X पर 83.1 फॉलोवर्स मिलियन आणि किम कार्दशियां चे X वर 75.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
भारतातील नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींचे X वर सर्वाधिक फॉलोवर्स आहेत. विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांचे X वर 26.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे X पर 27.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. समाजवादी पार्टी चे अखिलेश यादव यांचे X वर 19.9 मिलियन आणि पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे X वर 7.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच आरजेडी चे लालू प्रसाद यादव यांचे X वर 6.3 मिलियन, तेजस्वी यादव यांचे 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर एनसीपी प्रमुख शरद पवार यांचे X वर 2.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.