पाण्यामध्ये फोटो काढण्याची इच्छा आता पूर्ण होणार, Realme घेऊन येतोय अंडरवॉटर फोटोग्राफी मोड स्मार्टफोन
Realme ने चीनसाठी आपल्या प्रमुख Realme GT 7 Pro स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. येत्या 2 दिवसांत म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी Realme GT 7 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. चीनमध्ये फोन लाँच केल्यानंतर कंपनी भारतातही आणणार आहे. हा फोन भारतात याच महिन्यात लाँच होणार आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिला फोन असेल असेही कंपनीने म्हटले आहे, ज्यात Qualcomm चे लेटेस्ट Snapdragon 8 Elite असेल.
हेदेखील वाचा- Google आणि Microsoft ची चिंता वाढली! OpenAI ने लाँच केलं सर्च इंजिन, युजर्सना मिळणार नवा ऑप्शन
लाँच झाल्यानंतर या स्मार्टफोनची विक्री ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर केली जाईल. Realme च्या या नवीन स्मार्टफोनमुळे अंडरवॉटर फोटोग्राफी करण्याची अनेकांची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण Realme GT 7 Pro स्मार्टफोनमध्ये अंडरवॉटर फोटोग्राफी मोड दिला जाणार आहे. यामुळे हा फोन फोटोग्राफीची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठीच खास असणार आहे. Realme च्या या फ्लॅगशिप फोनच्या कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे. ब्रँडच्या अधिकृत Weibo पेजवर आणखी काही गोष्टी नमूद केल्या आहेत. (फोटो सौजन्य – Realme)
या वर्षी लाँच झालेल्या बहुतेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असेल, परंतु Realme या बाबतीत काहीतरी वेगळे करणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये काहीतरी खास असणार आहे. Realme नवीन GT 7 Pro फोन अंडरवॉटर फोटोग्राफी मोडसह घेऊन येणार आहे. हे डिव्हाईस पाण्याखालील फिंगरप्रिंट अनलॉकिंगला सपोर्ट करेल आणि अनलॉक केल्यानंतर कॅमेरा ॲप थेट उघडेल. वापरकर्ते मागील आणि पुढच्या दोन्ही कॅमेऱ्यांमधून फोटो क्लिक करू शकतील आणि झूम इन देखील करू शकतील.
हा फोन पाण्याच्या नुकसानापासून वाचवण्यासाठी आपोआप पाणी काढून टाकेल. एवढेच नाही तर ब्रँडचा दावा आहे की Realme GT 7 Pro मध्ये AI DMmotion अल्गोरिदम देखील असेल जे 1/1,000 सेकंदाच्या वेगाने हलणारे क्षण कॅप्चर करेल. Realme GT 7 Pro मध्ये 3X ऑप्टिकल झूम, 6X लॉसलेस झूम आणि टेलीफोटो कॅमेऱ्याद्वारे 120X पर्यंत डिजिटल झूम वैशिष्ट्यीकृत आहे.
हेदेखील वाचा- Google Maps vs MAPPLS: भारतीयांसाठी कोणता नेव्हिगेशन ॲप ठरेल सर्वोत्तम, जाणून घ्या
Realme GT7 Pro मध्ये Snapdragon 8 Elite SoC चिपसेट असल्याची माहिती समोर आली आहे. यात Qualcomm चा कस्टम Orion Core CPU आहे, ज्याचा टॉप क्लॉक स्पीड 4.32GHz आहे. Realme ही चिप 12GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेजसह जोडेल. यात 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 6,500 mAh बॅटरी असेल. हा फोन Samsung Eco 2 OLED Plus डिस्प्ले सह येत आहे.
चीनमध्ये Realme GT7 Pro स्मार्टफोन CNY 3,999 म्हणजेच अंदाजे 47,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात येणार आहे. हा नवीन स्मार्टफोन मार्स एक्सप्लोरेशन एडिशन, स्टार ट्रेल टायटॅनियम आणि लाइट डोमेन व्हाइट कलर पर्यायांमध्ये सादर केला जाणार आहे. Realme ने दावा केला आहे की GT Pro चा AnTuTu स्कोअर या चिपसेटमुळे फोन अधिक पावरफुल बनतो.