फोटो सौजन्य - pinterest
जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. अनेक ठिकाणी माणसांची जागा रोबोट आणि AI ने घेतली आहे. रोबोट आणि AI माणसांप्रमाणेच सर्व कामं करत आहेत. असं एकही कामं नसेल जे रोबोट आणि AI करू शकत नाही. अगदी प्रत्येक क्षेत्रात रोबोट आणि AI चा वापर केला जात आहे. घर, हॉटेल, शाळा, कॉलेजसह आता वैद्यकीय क्षेत्रात देखील रोबोटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोबोटच्या साहाय्याने अनेक ऑपरेशन केले जात आहेत. आता अमेरिकेतून एक अशी घटना समोर आली आहे, जिथे डॉक्टरांनी रोबोटच्या मदतीने किडनी ट्रांसप्लांट करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- डॉक्टर रुग्णापासून 5000 किमी दूर; रोबोटच्या मदतीने केलं रुग्णाचं ऑपरेशन
आतापर्यंत केवळ ऑपरेशनसाठी रोबोटची मदत घेतली जात होती. मात्र आता रोबोटच्या साहाय्याने किडनी ट्रांसप्लांट देखील केलं जात आहे. हे तंत्राज्ञान सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँड शहरात डॉक्टरांनी रोबोटच्या मदतीने किडनी ट्रांसप्लांट केलं आहे. क्लीव्हलँड शहरात राहणारे ७० वर्षीय जोन कुकुला यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांच्या किडन्यांचे ट्रांसप्लांट करणं गरजेचं होतं.
हेदेखील वाचा- जगातील पहिला ‘इमोशनल’ रोबोट तयार! कधी हसणार तर कधी रडणार; माणसांप्रमाणेच भावना व्यक्त करणार
यासाठी जोन कुकुला यांनी डॉ. मोहम्मद एल्तेमामी आणि त्यांच्या टीमची क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांना सांगण्यात आलं होतं की, ही टीम ऑपरेशनदरम्यान एक नाव इतिहास घडवणार आहे. हे ऑपरेशन जगासाठी एक उदाहरण ठरणार आहे. आणि तसंच झालं. डॉ. मोहम्मद एल्तेमामी आणि त्यांच्या टीमने रोबोटच्या मदतीने किडनी ट्रांसप्लांट केलं. त्यामुळे हे ऑपरेशन मानवी इतिहासात खरोखरचं एक उदाहरण ठरलं आहे. रोबोटच्या मदतीने करण्यात आलेलं ऑपरेशन यशस्वी ठरलं आहे.
गेल्या वर्षी दिल्लीतील एका रुग्णालयातही रोबोटच्या मदतीने अशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही यशस्वी शस्त्रक्रिया होती आणि यामुळे दिल्लीतील एका 32 वर्षांच्या मुलाला वाचवण्यात यश आले. या रुग्णाला युरेटर ब्लॉक होण्याची समस्या होती आणि त्यामुळे मुलाच्या किडनीला संसर्ग होऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी रोबोटच्या साहाय्याने ही शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत रुग्णाचा रक्तस्त्राव कमी झाला.
मानवी शरीरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे सर्जरी करणारी साधने सहज पोहोचत नाहीत. पण रोबोट हे काम क्षणार्धात करू शकतो. याशिवाय, रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्णपणे नियोजित आहे आणि ती डेटाच्या आधारे सर्वकाही करते, त्यामुळे चूक होण्याची शक्यता नसते. याशिवाय, रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये, रुग्णाला कमी रक्तस्त्राव होतो आणि खूप कमी चीरा देखील असते. त्यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टर ऑपरेशनसाठी रोबोटची मदत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या तर भविष्यात अनेक शस्त्रक्रियांमध्ये रोबोटचा वापर करता येईल, असे डॉक्टरांचे मत आहे. यामुळे लोकांवर त्वरीत शस्त्रक्रिया तर होईलच, तसेच त्यांच्या जीवालाही कमी धोका होईल. भविष्यात जर डॉक्टरांशिवाय केवळ रोबोट शस्त्रक्रिया करण्यात यशस्वी झाले, तर ज्या ठिकाणी चांगले डॉक्टर नाहीत अशा ठिकाणीही लोक सहजपणे शस्त्रक्रिया करू शकतील. तसेच रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया लोकांसाठी परवडणारी देखील असेल.