Royal Enfield चा नवा धमाका! Himalayan 750 मध्ये मिळणार क्रूझ कंट्रोलसह दमदार इंजिन

रॉयल एनफील्डने आपली आतापर्यंतची सर्वात दमदार बाईक Himalayan 750 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.89 लाख रुपये असून ती तीन व्हेरिएंट आणि पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Royal Enfield Himalayan 750
Royal Enfield Himalayan 750 (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • Himalayan 750 भारतात लॉन्च

  • 743cc इंजिनसह 55hp पॉवर

  • सुरुवातीची किंमत 4.89 लाख रुपये

Royal Enfield Himalayan 750: रॉयल एनफील्डने शेवटी आपली आतापर्यंतची सगळ्यात दमदार बाईक Himalayan 750 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. नुकतंच इटलीमध्ये झालेल्या EICMA 2026 मोटरसायकल शोमध्ये या बाईकचं ग्लोबल डेब्यू झालं होतं. नंतर कंपनीने गोव्यात झालेल्या Motoverse च्या पहिल्या दिवशी ही बाईक दाखवली. आता ही बाईक इंडियन ग्राहकांसाठी लॉन्च झाली आहे. ही बाईक तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट आणि पाच कलर ऑप्शनमध्ये बाजारात आली आहे. तिची सुरुवातीची किंमत 4.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे.

• बुकिंग कधीपासून?

रॉयल एनफील्डने Himalayan 750 च्या बुकिंगची पण घोषणा केली आहे.

1. सामान्य ग्राहक : 1 डिसेंबरपासून ही बाईक कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट आणि अधिकृत डीलरशिपवरून बुक करता येईल.

2. Motoverse वाले : गोव्यात झालेल्या Motoverse इव्हेंटमध्ये सामील झालेल्या लोकांना आजपासूनच ही बाईक बुक करता येईल.

3. डिलिव्हरी : सध्या कंपनीने बाईकची डिलिव्हरी कधीपासून सुरू होईल याची तारीख सांगितलेली नाही.

• बाईकचा साईज कसा आहे?

नवी Himalayan 750 कंपनीने लांबच्या प्रवासासाठी आणि अवघड रस्त्यांसाठी तयार केली आहे.

1. लांबी-रुंदी : 1,522 मिमी लांब व्हीलबेस असलेल्या या बाईकची एकूण लांबी 2,185 मिमी, रुंदी 840 मिमी आणि उंची 1,450 मिमी आहे.

2. ग्राउंड क्लिअरन्स : बाईकमध्ये 205 मिमी चा ग्राउंड क्लिअरन्स दिलाय, जो खराब रस्ते आणि ऑफ-रोडिंगसाठी बेस्ट आहे.

3. सीट आणि वजन : तिची सीटची उंची 815 मिमी आहे, आणि एकूण वजन 224 किलो आहे. बाईकमध्ये 17.8 लिटरचा फ्युएल टँक मिळतो, जो लांबच्या ट्रिपसाठी पुरेसा आहे.

Royal Enfield Himalayan 750
भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू

• डिझाईन कसं आहे?

1. लूक : Himalayan 750 चे बरेच डिझाईन एलिमेंट्स छोट्या Himalayan 450 सारखेच आहेत. यात गोल हेडलॅम्प, फ्युएल टँकचा शेप आणि बाईकचा ओव्हरऑल लूक बराचसा त्याच डिझाईनवर आधारित आहे.

2. प्रॅक्टिकल गोष्टी : बाईकमध्ये विंड प्रोटेक्शनसाठी अॅडजस्टेबल फ्रंट विंडस्क्रीन दिलाय, ज्याला गरजेनुसार वर किंवा खाली करता येईल. सोबत स्प्लिट सीट डिझाईन लांबच्या प्रवासात रायडर आणि मागे बसणाऱ्याला आरामदायी राईड देईल.

• इंजिन आणि परफॉर्मन्स

1. इंजिन : नव्या Himalayan 750 मध्ये कंपनीने नवा 743 सीसी चा दमदार पॅरेलल ट्विन इंजिन दिलाय. हे इंजिन 55hp ची पॉवर आणि 63Nm चा टॉर्क देतं.

2. टॉर्क : कंपनीचा दावा आहे की बाईकच्या एकूण टॉर्कचा 90% हिस्सा 3,500 आरपीएममध्येच मिळून जातो. याचा अर्थ कमी स्पीडवर पण बाईकला चांगली पॉवर मिळेल, जे ऑफ रोडिंगसाठी खूप चांगलं आहे.• किंमत आणि व्हेरिएंट1. अलॉय व्हील व्हेरिएंट : एजटेक ग्रीन, ब्लॅक - 4.89 लाख रुपये

2. ट्यूबलेस क्रॉस-स्पोक : वाइकिंग ब्रॉन्झ, साइबेरिया व्हाईट - 5.14 लाख रुपये

3. टॉप व्हेरिएंट : अंटार्कटिक सिल्व्हर - 6.29 लाख रुपयेटॉप व्हेरिएंटच्या किंमतीत एक छोटी कार येईल. पण अॅडव्हेंचरच्या शौकिनांसाठी त्यात कंपनीने खास GIVI अॅक्सेसरीजचा पॅकेज दिलाय. यात टॉप बॉक्स, पॅनियर्स, हीटेड ग्रिप्स, हँडगार्ड आणि अॅल्युमिनियम स्किड प्लेट आहे.

Royal Enfield Himalayan 750
EV प्रेमींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीत Hyundai आणि Tata च्या नव्या Car'sची प्रतीक्षा संपणार

• फीचर्स काय मिळणार?

तिन्ही व्हेरिएंटमध्ये जवळपास सारखेच फीचर्स मिळतात. Himalayan 750 ही रॉयल एनफील्डची आतापर्यंतची सगळ्यात जास्त फीचर्स असलेली बाईक आहे. यात क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स दिले. बाईकमध्ये नवा LED हेडलाईट दिलाय, जो आधीच्या हेडलाईटपेक्षा जास्त प्रकाश देतो, असा कंपनीचा दावा आहे.