फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नॅशनल कॅपिटन रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) ने RRTS Connect ॲप अनेक नवीन फीचर्ससह अपडेट केलं आहे. या नवीन फीचर्समुळे युजर्सचा प्रवासाचा अनुभव अधित सोपा होणार आहे. याबाबत NCRTC ने शनिवारी एक निवेदन सादर केलं आहे. NCRTC ने म्हटलं आहे की, RRTS Connect अनेक नवीन फीचर्ससह अपडेट करण्यात आलं आहे. यामध्ये तिकीट बुकिंग, थेट ट्रेन ट्रॅकिंग आणि स्टेशन नेव्हिगेशन सारख्या सुविधा आता उपलब्ध होणार आहेत. RRTS Connect ॲपमध्ये जारी केलेल्या नवीन फीचर्समुळे नमो भारत ट्रेनमधील प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि सोपा होईल.
हेदेखील वाचा- तुमचा X अकाऊंंटवरील डेटा वापरून AI ला दिली जातेय ट्रेनिंग; आत्ताच तुमच्या अकाऊंटमध्ये करा ‘ही’ सेटिंग
NCRTC ने सांगितलं की, ‘RRTS Connect ॲप Google Play आणि Apple Play Store वर उपलब्ध आहे. या ॲपमध्ये आता अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम म्हणजेच RRTS कॉरिडॉरमध्ये प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. तसेच पेमेंटसाठी UPI, डेबिट, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग पर्याय उपलब्ध असतील. यासह, युजर्स ॲपमध्येच त्यांच्या मागील प्रवासाची माहिती आणि तिकिटे सहजपणे डाउनलोड करू शकतात.
हेदेखील वाचा-पंतप्रधान मोदींचे X वर 100 मिलीयन फॉलोवर्स! पाहा कोणत्या नेत्याचे किती फॉलोवर्स
ॲपमधील लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग फीचर नमो भारत ट्रेनच्या प्रवाशांना पुढील 30 मिनिटांत येणाऱ्या ट्रेनबद्दल रिअल टाइम माहिती देईल. याशिवाय पुढील स्थानकांच्या दिशेचीही माहिती मिळेल. यामध्ये दिल्ली ते मेरठपर्यंतचा परिसर व्यापला जाईल. संपूर्ण प्रवासासाठी लागणारा अंदाजे वेळ देखील RRTS व्दारे सांगितला जाईल. यासोबतच गाड्यांच्या पूर्ण वेळापत्रकाची सुविधाही उपलब्ध होणार असून, यामध्ये आठवड्यातून किती दिवस ट्रेन धावणार आणि किती वाजता धावणार याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. फीडर बसेसची माहिती देखील RRTS Connect ॲपमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये तुम्हाला गाड्यांचा येण्याचा वेळ आणि जाण्याचा वेळ यासोबतच बस थांबे, प्रवासाचे सुरुवातीचे स्थानक आणि जवळपासच्या RRTS स्थानकांची माहिती मिळेल. त्यामुळे प्रवासाचे नियोजन अधिक सोपे होईल.
याशिवाय, RRTS कनेक्ट ॲपद्वारे, प्रवासी स्टेशनवरूनच बाइक, ऑटो आणि कॅब बुक करू शकतील. यामध्ये युजर्सना ॲपमध्ये रॅपिडो ॲपची सेवा मिळेल. यामुळे सर्व प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सहज पोहोचता येणार आहे. स्टेशनशी संबंधित सर्व माहिती ॲपमध्येच उपलब्ध असेल. स्टेशन शोधण्यासाठी एक लँडमार्क देखील प्रदान केला जाणार आहे. यासोबतच स्टेशनवरील पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, एंट्री आणि एक्झिट गेट्सचीही सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ॲपमध्ये प्लॅटफॉर्मची माहिती, ट्रेनच्या दिशेची माहिती, स्टेशनवर उपलब्ध असलेल्या लिफ्ट आणि एस्केलेटर, उपलब्ध पार्किंगची माहिती देण्यात आली आहे. स्टेशन कंट्रोल रूमची माहिती देखील ॲपमध्येच उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची मदत आणि सूचना सहज उपलब्ध होणार आहेत.