बजेट कमी, पण फीचर्स दमदार! Samsung चा नवा 5G स्मार्टफोन भारतात दाखल; किंमत 20 हजार रुपयांहून कमी
फक्त 1 रुपयांत भरपूर फायदे! BSNL च्या ऑफरची मुदत वाढली, कोणत्या यूजर्सना मिळणार फायदा? जाणून घ्या
कंपनीने नवा सॅमसंग गॅलेक्सी एफ70 5G स्मार्टफोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. या स्मार्टफोनची विक्री 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा मुख्य रिटेल स्टोअर्समधून या स्मार्टफोनची खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन विविड व्हायोलेट आणि बोल्ड ब्लॅक या दोन रंगांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Samsung)
सॅमसंग गॅलेक्सी एफ70 5G मध्ये 6.7 इंच सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 चे प्रोटेक्शन मिळणार आहे.
परफॉर्मंससाठी कंपनीने या नवीन स्मार्टफोनमध्ये 5nm टेक्नोलॉजीवर आधारित Exynos 1330 प्रोसेसर दिला आहे. डिव्हाईसमध्ये Mali-G68 एमपी2 जीपीयू मिळणार आहे. फोनमध्ये अँड्रॉईड 17 वर आधारित वन यूआय 9.5 आहे. या डिव्हाईसमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट देखील मिळणार आहे, ज्यामुळे तुम्ही फोनचे स्टोरेज आणखी वाढवू शकता.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) ला सपोर्ट करतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 5MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरे 1080p रेजोल्यूशनमध्ये 30fps वर व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतात.
Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे
याशिवाय, कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 25W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, IP54 रेटिंग देखील मिळणार आहे, जी पाणी आणि धुळीपासून सुरक्षा देते. तर कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये डुअल सिम, वायफाय 5, ब्लूटूथ 5.3 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Ans: सॅमसंग गॅलेक्सी एफ70 5G ची सुरुवातीची किंमत 17,999 रुपये आहे.
Ans: या स्मार्टफोनची विक्री 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
Ans: या फोनमध्ये 50MP प्रायमरी OIS कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा मिळतो.






