फोटो सौजन्य - सोशल मिडीया
YouTube हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील अनेकजण YouTube वर शिक्षण, मनोरंजन, डान्स, सिनेमा, पॉडकास्ट, गाणी इत्यादी अनेक व्हिडीओ बघतात. अनेक सोशल मिडीया क्रिएटर्स त्यांच्या रोजच्या जिवनातील Blogs देखील YouTube वर शेअर करतात. अनेक क्रिएटर्स YouTube वरच अवलंबून असतात. आपल्याला देखील काही समस्या असेल किंवा कोणत्या गोष्टीविषयी माहिती शोधायची असेल तर आपण YouTube चा वापर करतो. जभरातील कोट्यावधी लोकांची YouTube ला पंसती आहे. त्यामुळे या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी Google व्दारे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर अनेक नवीन फीचर लाँच केले जातात.
Google ने नुकतेच YouTube वर Play, Sing, Hum to Search असे फीचर लाँच केले होते. या सर्व फीचर्सना वापरकर्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर आता Google सध्या अशाच एका YouTube च्या नव्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर AI शी संबंधित आहे. ‘Ask for Music’ असे या नव्या AI चॅटबोटचे नाव असणार आहे. ‘Ask for Music’ या AI चॅटबोटचा वापर करून तुम्ही YouTube वर तुमच्या आवडीची गाणी अगदी सहज शोधू शकता. ‘Ask for Music’ हे AI चॅटबोट तुम्ही शोधत असलेल्या गाण्याच्या कलाकारांची देखील माहिती मिळू शकणार आहे. Google सध्या ‘Ask for Music’ हे AI चॅटबोट प्रायोगित तत्वावर लाँच करणार आहे. Google अद्याप या AI चॅटबोटवर काम करत आहे. Google चा हा प्रयोग यशस्वी झाल्यास Google चे YouTube वरील ‘Ask for Music’ ही पहिली पूर्ण AI सेवा असणार आहे. Google च्या नव्या फीचरबद्दल वापरकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
YouTube मध्ये सध्या दोन AI फीचर कार्यरत आहेत. ज्यामध्ये New Audio-Based Search आणि AI-Generated Playlist Cover यांचा समावेश आहे. New Audio-Based Search च्या मदतीने वापरकर्ते केवळ YouTube वरील माईकच्या साहाय्याने संबंधित व्हिडीओ शोध शकतात. तर AI-Generated Playlist Cover वापरकर्त्यांनी तयार केलेल्या प्लेलिस्टसाठी प्रतिमा तयार करण्यासाठी मदत करते.