आता गाणी ऐकण्याचा आनंद होईल दुप्पट! Spotify चे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन केवळ 15 रुपयांमध्ये
Spotify युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन सुरु केला आहे. स्वस्त आणि परवडणाऱ्या किंमतीत लाँच करणाऱ्यात आलेला हा नवीन प्लॅन Spotify युजर्ससाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. Spotify ने त्याच्या इंडिविजुअल प्लॅनसाठी एक आकर्षक ऑफर सादर केली आहे. आता Spotify युजर्स फक्त 59 रुपयांमध्ये चार महिन्यांसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळवू शकता. म्हणजेच तुम्ही महिन्याला केवळ 15 रुपये खर्च करून जाहिरातीशिवाय गाणी ऐकू शकता. ही ऑफर केवळ 13 ऑक्टोबरपर्यंत व्हॅलिड असणार आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.
हेदेखील वाचा- फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर, सॅमसंगचा 60 हजार रुपयांचा प्रीमियम स्मार्टफोन अर्ध्या किमतीत उपलब्ध
खरं तरं Spotify च्या या सबस्क्रिप्शनची किंमत 119 रुपये प्रति महिना आहे. पण आता सुरु करण्यात आलेल्या नवीन ऑफरमुळे तुम्हाला Spotify चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी प्रति महिना केवळ 15 रुपये भरावे लागणार आहेत. Spotify चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी आतापर्यंत तुम्हाला दर महिन्याला 119 रुपये खर्च करावे लागत होते. पण आता तुम्हाला इतका खर्च करण्याची गरज नाही. कारण कंपनीने सुरु केलेल्या ऑफर अंतर्गत, Spotify एका महिन्यासाठी 15 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. कंपनी ही खास ऑफर मर्यादित काळासाठी देत आहे. कोणताही Spotify युजर या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याचा फायदा कसा घेता येईल आणि त्यात कोणते फायदे उपलब्ध आहेत, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
Spotify च्या या ऑफर अंतर्गत, युजर्स 15 रुपयांपेक्षा कमी दरमहा इंडिविजुअल प्लॅनचे सदस्यत्व घेऊ शकतात. त्याच्या चार महिन्यांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 59 रुपये खर्च करावे लागतील. फक्त 59 रुपये खर्च करून, तुम्ही चार महिने जाहिरातींशिवाय तुमच्या आवडत्या गाण्यांचा आनंद घेऊ शकता. पॉडकास्ट ऐकू शकतो.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल. कंपनीची ही ऑफर केवळ 13 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध आहे. जर तुम्ही आज हा प्लॅन घेतला तर तुम्हाला केवळ 59 रुपयांमध्ये पुढील चार महिन्यांसाठी Spotify च्या सर्व सेवा मिळतील. मात्र चार महिन्यांनंतर पुन्हा दरमहा 119 रुपये खर्च करावे लागतील.
हेदेखील वाचा-सकाळी उठताच स्मार्टफोनचा वापर करणं ठरेल धोकादायक, मानसिक तणावात होऊ शकते वाढ
कोणताही वापरकर्ता या प्लॅनचा लाभ घेऊ शकतो. तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला Spotify इन्स्टॉल करावे लागेल. आधीपासून इन्स्टॉल केलेले असल्यास, होम पेजवरील प्रीमियम पर्यायावर टॅप करा आणि प्रीमियम इंडिविजुअल वर टॅप करा. तुम्ही येथे पेमेंट करून सबस्क्रिप्शन घेऊ शकता.
इंडिविजुअल प्लॅनव्यतिरिक्त, कंपनीकडे इतर योजना देखील आहेत ज्या लोकप्रिय आहेत. यामध्ये मिनी सबस्क्रिप्शन 29 रुपये प्रति आठवड्याला उपलब्ध आहे. तुम्ही Spotify चे सदस्यत्व 2 महिन्यांसाठी179 रुपयांमध्ये घेऊ शकता. यामध्ये जाहिराती मुक्त संगीत आणि पॉडकास्टचा आनंद एकाच वेळी 6 फोनवर घेता येणार आहे.
Spotify देखील 149 रुपयांचा Duo प्लॅन ऑफर करते. यामध्ये दोन प्रीमियम अकाऊंट आणि कधीही रद्द करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शेवटी, कंपनी विद्यार्थ्यांसाठी एक योजना देखील देते. ज्याची किंमत फक्त 59 रुपये आहे. यामध्ये तुम्ही दोन महिने जाहिराती मुक्त संगीत आणि पॉडकास्ट वापरू शकता.