फोटो सौजन्य - istock
भारत प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती करत आहे. आपल्या देशात 2022 मध्ये 5G नेटवर्क सुरु करण्यात आलं आहे. खेड्यापाड्यांमध्ये 4G नेटवर्क सुरु आहे. तर काही दुर्गम भागात 3G नेटवर्क देखील वापरलं जातं आहे. मात्र या 5G च्या जगातही काही लोकं अजूनही 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. सरकार 2G नेटवर्कच्या कंपन्या बंद करण्यावर भर देत असली, तरीही काही लोकं अजूनही 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. मात्र 2G नेटवर्कमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच 2G नेटवर्कचा वापर करणं असुरक्षित ठरू शकतं.
हेदेखील वाचा- आश्चर्यकारक! रोबोट करणार किडनी ट्रांसप्लांट; अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये झाली सुरुवात
आजही लाखो लोक 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. अलिकडच्या काळात सरकार भारतात 2G बंद करण्यावर भर देत आहे. याचे कारण म्हणजे 2G नेटवर्कमुळे भारतातील दूरसंचार ऑपरेटर्सना कमी महसूल मिळतो आणि हे नेटवर्क आजच्या काळात ब्राउझिंगसाठी योग्य नाही. 2G नेटवर्कच्या सुरक्षेतही अनेक त्रुटी आहेत. आजच्या 5G च्या जगाशी तुलना करता 2G नेटवर्क खूपच कमी सुरक्षित आहे, ज्यामुळे तुमच्या डिव्हाइसला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
हेदेखील वाचा- 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Motorola g04s लाँच! किंमत 7 हजार रुपयांपेक्षा कमी
2G नेटवर्कचा वापर करणाऱ्या डिव्हाइसवर Stingrays आणि False Base Stations सारख्या डिव्हाइसेसद्वारे हल्ला केला जाऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या फोनमधील डेटा लिक होऊन तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही 2G नेटवर्कचा वापर करत असाल तर हल्लेखोर तुमच्या डिव्हाइसला टार्गेट ठरवू शकतात. हल्लेखोर तुमच्या फोनला टार्गेट करण्यासाठी Stingrays आणि False Base Stations सारख्या उपकरणांद्वारे तुम्हाला बनावट एसएमएस पाठवतील. हे एसएमएस अधिकृत एसएमएसप्रमाणे दिसू शकतात, ज्यामुळे नागरिक फसवणुकीला बळी पडतात. Stingrays आणि False Base Stations सारख्या उपकरणांचा वापर करून बनावट एसएमएस पाठवून लोकांना टार्गेट करणं, याला एसएमएस ब्लास्टर्स बोललं जातं.
ज्यामध्ये युजर्सचे कनेक्शन 2G प्रोटोकॉलमध्ये डाउनग्रेड केले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एसएमएस ब्लास्टर्स 2G उपकरणांपर्यंत सहज पोहोचू शकतात. अशा प्रकारे, हॅकर्स तुम्हाला टार्गेट करून तुमचे बँक खाते रिकामे करण्यापासून ते तुमचा वैयक्तिक डेटा लिक करण्यांपर्यंत अनेक गोष्टी करू शकतात. त्यामुळे 2G नेटवर्कचा वापर करणंं तुमच्यासाठी एक गंभीर समस्या ठरू शकते. ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ९५ टक्क्यांहून अधिक गावांमध्ये आता इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. जिथे 3G/4G मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे. 3G/4G/5G नेटवर्क उपलब्ध असताना 2G का वापरावे? आपण आपल्या स्मार्टफोनवरून 2G नेटवर्क डिसेबल देखील करू शकतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नेटवर्क आणि इंटरनेट पर्याय निवडावा लागेल. येथे जाऊन तुम्हाला सिम ऑप्शन निवडावा लागेल. आता तुम्हाला येथे विविध नेटवर्क पर्याय दिसतील. येथून तुम्ही 2G नेटवर्क डिसेबल करू शकता.