charger (फोटो सौजन्य- pinterest)
आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल हे अत्यंत गरजेचं आहे. आपण रोज मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्टवॉच चार्ज ह्या गोष्टी वापरतोच आणि याला चार्ज करतो. परंतु तुम्हला माहिती आहे का चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने आपला डिवाइस खराब होऊ शकतो? आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक देखील असू शकते! मग करायचं काय? चला जाणून घेऊयात काही टिप्स जे डिव्हाइसची लाईफ आणि धोक्यापासून वाचवते.
Whirlpool ने भारतात लाँच केला सर्वात वेगवान कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर; फीचर्स ऐकून व्हाल थक्क
ओरिजिनल किंवा सर्टिफाइड चार्जरचा वापर करावे
नेहमी डिव्हाईस सोबत चार्जर आणि केबल किंवा कोणत्या विश्वासाच्या ब्रँडचा सर्टिफाइड चार्जरचा वापर करावा. सस्ते, अनब्रांडेड चार्जर नेहमी पावर नाही देत आणि बॅटरीचा नुकसान किंवा शॉर्ट सर्किटचा कारण ठरू शकते.
ओवरचार्जिंग टाळा
आधुनिक उपकरणांना ओव्हरचार्ज संरक्षण असते, परंतु १००% चार्ज झाल्यानंतरही त्यांना जास्त काळ प्लग इन ठेवणे हे चांगले नाही. रात्रभर चार्जिंग केल्याने उष्णता वाढू शकते आणि बॅटरीवर ताण येऊ शकतो.
२०% ते ८०% दरम्यान चार्ज करा
लिथियम-आयन बॅटरीसाठी २०% ते ८०% चार्ज पातळी उत्तम असते. ही श्रेणी बॅटरीचे आरोग्य राखते आणि तिचे आयुष्य वाढवते.
डिव्हाइस थंड ठेवा
उष्णता हा बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू आहे. चार्जिंग करताना उपकरण उशीखाली, चादरीत किंवा उन्हात ठेवू नका. तसेच, चार्जिंग करताना हैवी अॅप्स किंवा गेम वापरू नका कारण यामुळे ओवरहीटिंग म्हणजेच जास्त गरम होऊ शकते.
गरम झाल्यावर अनप्लग करा
जर चार्जिंग करताना फोन किंवा लॅपटॉप असामान्यपणे गरम झाला तर तो ताबडतोब अनप्लग करा. थंड झाल्यावर पुन्हा लावा. वारंवार गरम होणे हे हार्डवेअर किंवा चार्जरच्या समस्येचे संकेत होऊ शकते..
चार्जिंग करताना जास्त वापरू नका
चार्जिंग करताना डिव्हाइसचा जास्त वापर केल्याने उष्णता वाढते आणि चार्जिंगचा वेग कमी होतो. हलका वापर ठीक आहे, पण गेमिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग टाळा.
पोर्ट धूळ किंवा ओलावा आहे का ते तपासा.
चार्जिंग पोर्ट प्लग इन करण्यापूर्वी ते स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करा. ओलाव्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि धूळ चार्जिंग कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते.
निकृष्ट दर्जाच्या पॉवर बँका टाळा
जर तुम्ही पॉवर बँक वापरत असाल, तर विश्वासार्ह ब्रॅण्डचा पॉवर बँक खरेदी करा ज्यामध्ये ओव्हरकरंट आणि तापमान संरक्षण यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
या सोप्याटिप्सचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही तुमच्या डिव्हाइसची बॅटरी लाईफ वाचवू शकता आणि प्रत्येक वेळी सुरक्षित, कार्यक्षम चार्जिंग सुनिश्चित करू शकता.