फोटो सौजन्य - pinterest
Tata Play Binge ने त्यांच्या युजर्ससाठी अतिशय स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला केवळ 149 आणि 199 मध्ये अनेक ott अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅन्समध्ये युजर्सना अनलिमिटेड फायदे मिळणार आहेत. Tata Play Binge ने अलीकडेच 199 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे, जो स्वस्त असण्यासोबतच फायदेशीर देखील आहेत. 199 रुपयांच्या प्लॅन व्यतिरिक्त, तुम्ही इतर कोणताही परवडणारा प्लॅन घेण्याचा विचार करत असाल, तर 149 आणि 349 रुपयांचे प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. Tata Play Binge च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळतील.
Tata Play Binge ने अलीकडेच 199 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे, जो स्वस्त असण्यासोबतच फायदेशीर देखील आहेत. 199 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला Prime video, Apple TV, Disnye+Hotstar, zee5, sonyliv, lionstage play, discovery+, fancode, sun nxt, klikk, epic on यासह इतर ott अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 199 च्या प्लॅनमध्ये तुम्ही एकाच वेळी 4 वेगवेगळ्या डिव्हाईसवर लाग इन करू शकता. 149 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला त्यात Amazon Prime Video चा पर्याय मिळणार नाही. तर 149 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला Disnye+Hotstar, zee5, sonyliv, Apple TV, lionstage play, discovery+, fancode, sun nxt, CHAUPAL, epic on,यासह इतर ott अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 149 च्या प्लॅनमध्ये देखील तुम्ही एकाच वेळी 4 वेगवेगळ्या डिव्हाईसवर लाग इन करू शकता.
तर 349 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 34 OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ज्यामध्ये Amazon Prime lite, Apple TV, Disnye+Hotstar, zee5, sonyliv, lionstage play, discovery+, fancode, epic on, Shemaroo Entertainment, hungama, ANIMAX, max player, movies now, KLIKK,CHAUPAL, travelxp, planet मराठी, stage, playfix, SHPRTSTV,DOCUBAY, NAMMAFLIX, Curiosity Stream, manorama, RD, VF OTT, FUSE, PTC PLAY, IM, Distro TV, sun nxt या अॅप्सचा समावेश आहे. 349 च्या प्लॅनमध्ये देखील तुम्ही एकाच वेळी 4 वेगवेगळ्या डिव्हाईसवर लाग इन करू शकता. पण या प्लॅनमध्ये काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जसं की Amazon Prime lite केवळ टिव्ही आणि मोबाईल या दोन डिव्हाइसवर प्ले करता येईल. तसेच sun nxt केवळ टिव्हीवर प्ले करता येईल. तसेच sonylive वरील live sports केवळ टिव्हीवर प्ले करता येईल.