AI वापरून Hackers करतायत प्लॅन! सर्वात मोठ्या सायबर अटॅकची तयारी सुरु, 250 करोड Gmail अकाउंट्स धोक्यात
टेक कंपनी गूगलने त्यांच्या Gmail युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे. सर्वात मोठ्या सायबर अटॅकची तयारी सुरु झाली आहे. हा सायबर अटॅक Gmail युजर्सवर होणार असून 250 कोटी Gmail अकाउंट्स धोक्यात असल्याचं गूगलने सांगितलं आहे. सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, हॅकर्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या मदतीने हा सायबर अटॅक करण्याची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत Gmail युजर्सने सावध राहणं गरजेचं आहे.
सरकार देतेय मोफत लॅपटॉप? काय आहे सोशल मीडियाच्या व्हायरल दाव्यामागील सत्य? जाणून घ्या
गुगलने जारी केलेल्या अलर्टनुसार, 250 कोटी Gmail अकाउंट्स सायबर हल्ल्याच्या धोक्यात आहेत. हॅकर्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या मदतीने लोकांना फसवत आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये प्रवेश मिळवत आहेत. हे सायबर गुन्हेगार स्वतः गुगल सपोर्ट एजंट असल्याचा दावा करत वापरकर्त्यांकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे युजर्सची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
बनावट कॉल आणि ईमेल: फोर्ब्सच्या अहवालानुसार, हॅकर्स गुगल सपोर्ट एजंट असल्याचे भासवतात आणि वापरकर्त्यांना कॉल करतात. हॅकर्स युजर्सना सांगतात की त्यांचं Gmail अकाऊंट हॅक झालं आहे आणि ते रिकव्हर करण्यासाठी एक रिकव्हरी कोड पाठवला जाईल. हा कोड एखाद्या युजर्सनी हॅकरला सांगितला तर क्षणार्धात त्याचं Gmail अकाऊंट हॅक होऊ शकतं.
बनावट रिकव्हरी कोड: हॅकर्सनी पाठवलेले ईमेल आणि रिकव्हरी कोड पूर्णपणे खरे दिसतात, ज्यामुळे वापरकर्त्यांची फसवणूक होते. वापरकर्त्यांना वाटते की त्यांचे खाते सुरक्षित केले जात आहे, परंतु प्रत्यक्षात ते हॅकर्सना त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश देतात. ज्यामुळे युजर्सची संपूर्ण माहिती हॅकर्सकडे जाते आणि त्यांची फसवणूक होते.
जर तुम्हाला असा कोणताही संशयास्पद कॉल किंवा ईमेल आला तर त्याकडे ताबडतोब दुर्लक्ष करा. जर तुम्ही चुकून रिकव्हरी कोड वापरला असेल, तर तुमचा जीमेल पासवर्ड ताबडतोब बदला.
ChatGPT Update: OpenAI ने लाँच केलं नवीन टूल! युजर्सना मिळणार सुपर पॉवर, जाणून घ्या वैशिष्ट्ये
तुमच्या Gmail खात्याची सुरक्षा वाढवण्यासाठी, Two-Factor Authentication (2FA) चा वापर करणं सर्वोत्तम हा पर्याय आहे. यामुळे तुमची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. यामुळे, जरी हॅकरला तुमचा पासवर्ड माहित असला तरी, तो फोन किंवा सुरक्षा कोडशिवाय तुमच्या खात्यात प्रवेश करू शकणार नाही.