Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सनी इकडे लक्ष द्या, आजपासून लागू झाले नवीन नियम! महत्त्वाच्या गोष्टींमध्ये झाला बदल

Jio, Airtel, VI, BSNL सारख्या दूरसंचार कंपन्या नवीन मोबाइल टॉवर कुठे लावू शकतात याबद्दल नवीन नियमांत माहिती देण्यात आली आहे. टेलिकॉम कंपन्या आणि त्यांच्या युजर्ससाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 01, 2025 | 08:52 AM
Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सनी इकडे लक्ष द्या, आजपासून लागू झाले नवीन नियम! महत्त्वाच्या गोष्टींमध्ये झाला बदल

Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सनी इकडे लक्ष द्या, आजपासून लागू झाले नवीन नियम! महत्त्वाच्या गोष्टींमध्ये झाला बदल

Follow Us
Close
Follow Us:

देशात आज नवीन वर्षात 1 जानेवारी 2025 पासून दूरसंचार कंपन्यांसाठी अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सच्या सुरक्षेचा विचार करता दूरसंचार विभागाने नवीन नियम जाहीर केले होते. यातील काही नियम 2024 मध्ये लागू करण्यात आले होते. उर्वरित नियमांची अंमलबजावणी आज 1 जानेवारी 2025 पासून केली जाणार आहे.

IRCTC DOWN: एका महिन्यात तिसऱ्यांदा ठप्प झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करण्यात येतात अडचणी

सर्व कंपन्यांना दूरसंचार कायद्यात समाविष्ट केलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. हे नियम लागू करण्यामागे दूरसंचार कंपन्यांची सेवा सुधारणे हा दूरसंचार विभागाचा उद्देश आहे. आजपासून म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून दूरसंचार कायद्यात कोणत्या नवीन नियमांचा समावेश करण्यात आला आहे, याबद्दल जाणून घेऊया. कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व नविन नियमांचं दूरसंचार कंपन्यांना पालन करावं लागणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

आजपासून लागू होणार नवीन नियम

राइट ऑफ वे (RoW) नियम आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून देशभरात लागू होत आहे. सप्टेंबरमध्ये टेलिकॉम कायद्यात या नियमाचा समावेश करण्यात आला होता, मात्र आजपासून हा नियम लागू होणार आहे. ट्रायने स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व कंपन्यांना हे नियम पाळावे लागतील.

नवीन नियमांमध्ये काय आहे…

नवीन नियमांनुसार कंपन्यांना ऑप्टिकल फायबर लाइन्स आणि नवीन मोबाइल टॉवर्स बसवण्यावर भर द्यावा लागणार आहे. दूरसंचार विभागाने सांगितले आहे की, नवीन नियम 1 जानेवारीपासून सर्व टेलिकॉम कंपन्यांना लागू होतील. राइट ऑफ वे (RoW) नियमांच्या अंमलबजावणीमुळे कंपन्यांना त्यांच्या सेवा सुधारण्यास मदत होईल. Jio, Airtel, VI, BSNL सारख्या दूरसंचार कंपन्या नवीन मोबाइल टॉवर कुठे लावू शकतात याबद्दल नवीन नियमांत माहिती देण्यात आली आहे.

मोबाईल टॉवर बसवणं आता अधिक सोपं होणार

आता टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल टॉवर लावण्यासाठी फारशी गडबड करावी लागणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. यापूर्वी मोबाईल टॉवर बसवण्यासाठी कंपन्यांना अनेक ठिकाणची परवानगी घ्यावी लागत होती, मात्र आता एकाच ठिकाणाहून परवानगी घ्यावी लागणार आहे. Jio, Airtel, VI, BSNL या कंपन्यांचे युजर्स आणि देशभरातील टेलिकॉम कंपन्यांचा विचार करता हे नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन वर्षात Apple ची खास भेट! या दोन दिवसांसाठी Apple TV+ वर सर्व काही विनामूल्य उपलब्ध

टेलिकॉम ऑपरेटर्सनी केली होती विनंती

नवीन RoW नियम पारदर्शकता आणि कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी डिजिटल रेकॉर्ड राखण्याची प्रक्रिया सुलभ करते. काही दिवसांपूर्वी टेलिकॉम ऑपरेटर्सनी सरकारला आरओडब्ल्यू नियम लागू करण्याची विनंती केली होती. या नियमामुळे पारदर्शकता येईल आणि कार्यक्षमतेतही सुधारणा होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे लागू करण्यात आलेले हे नवीन नियम टेलिकॉम कंपन्यांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: Tech news new rules for telecom sector are changing form 1st january 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 08:52 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.