Google ची डोकेदुखी वाढली! OpenAI ने फ्रीमध्ये लाँच केला 'ChatGPT सर्च', या नवीन फीचर्सचा समावेश
कोणतीही गोष्ट सर्च करायची असेल तर आपण गुगलचा वापर करतो. आपल्याला गुगलची इतकी सवय झाली आहे की, आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील गुगलवर सर्च करतो. सर्वाधिक वापरलं जाणार सर्च इंजिन म्हणजे गुगल. गुगल आपल्याला आपल्या प्रत्येक कामात मदत करतो. पण आता गुगलची डोकेदुखी वाढणार आहे. कारण OpenAI ने गुगलसोबत स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच OpenAI ने सर्व वापरकर्त्यांसाठी ChatGPT सर्च मोफत सुरू केले आहे.
ChatGPT सर्च आता OpenAI च्या मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर अकाऊंट असलेल्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने दावा केला आहे की ॲप पूर्वीपेक्षा चांगले आणि प्रगत झाले आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ सशुल्क सदस्यांसाठी उपलब्ध होती. मात्र आता हे ॲप सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. OpenAI ने घेतलेल्या या निर्णयामुळे गुगलची डोकेदुखी वाढू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता OpenAI च्या मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर अकाऊंट असणारा कोणताही युजर ChatGPT चा मोफत वापर करण्यास सक्षम असणार आहे. आता अगदी कोणीही ChatGPT चा वापर करू शकते. OpenAI ने नोव्हेंबर 2024 मध्ये ChatGPT सर्च सुरू केला. यावेळी कंपनीने सांगितलं होतं की, ते ChatGPT सर्चमध्ये सतत नवीन गोष्टींचा समावेश करत आहेत. ज्यामुळे युजर्सना हा ॲप किंवा वेबसाईट वापरताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये. कंपनीचा हा ChatGPT सर्च आता थेट Google च्या सर्च इंजिनशी स्पर्धा करणार आहे, जे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.
लाँच सोबतच, OpenAI ने स्मार्टफोनसाठी ChatGPT सर्चची ऑप्टिमाइझ केलेली आवृत्ती सादर केली आहे. आता यामध्ये यूजर्सला व्हॉईस सर्च मोडची सुविधा देखील मिळणार आहे. ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. व्हॉईस सर्च मोड वापरकर्त्यांना फक्त व्हॉईस कमांडद्वारे प्रश्न विचारण्याची परवानगी देते. या मोडसह, वापरकर्ते ChatGPT सर्चसह अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात. यासह, OpenAI ने आपल्या ChatGPT AI चॅटबॉटसाठी व्हॉईस मोडमध्ये रिअल-टाइम व्हिडिओ आणि स्क्रीन शेअरिंगची सुविधा सुरू केली आहे.
कंपनीने ChatGPT च्या सर्चच्या नवीन फीचरबद्दल माहिती दिली. वापरकर्ते आता त्यांची स्क्रीन ChatGPT सह शेअर करू शकतात आणि अवघड प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. व्हिडिओ सुरू करण्यासाठी, वापरकर्त्यांना ChatGPT चॅट विंडोच्या तळाशी डावीकडे व्हिडिओ आयकॉन दिसेल. ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. स्क्रीन शेअरिंगसाठी कंपनी लवकरच, तीन-डॉट मेनूवर एक साधा टॅप स्क्रीन शेअर पर्याय आणू शकते.
Google Map Update: गुगल मॅपचे हे 12 सीक्रेट फीचर्स तुमच्यासाठी ठरतील वरदान!
नवीन कॅपिबिलिटीज आता ChatGPT Teams, Plus आणि Pro वापरकर्त्यांसाठी iOS आणि Android मोबाइल ॲप्सवर उपलब्ध आहेत. हे जानेवारीमध्ये ChatGPT Enterprise आणि Edu वापरकर्त्यांसाठी आणले जाईल. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की व्हॉइस मोड EU देशांमध्ये उपलब्ध होणार नाही.