POCO C75: POCO चा नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? थांबा, हे अपडेट ठरेल डोकेदुखी
स्मार्टफोन कंपनी Poco ने भारतात C सीरीज अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन POCO C75 लाँच केला आहे. 17 डिसेंबर रोजी हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून आज 19 डिसेंबरपासून या स्मार्टफोनची सेल लाईव्ह होणार आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून यामध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकजण या स्मार्टफोनच्या लाईव्ह सेलची वाट पाहत आहेत, जेणेकरून ते हा स्मार्टफोन खरेदी करू शकतील. तुम्ही देखील हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. (फोटो सौजन्य- X)
POCO च्या नवीन स्मार्टफोनमध्ये एक कमतरता आहे. स्मार्टफोनमध्ये एक असं अपडेट देण्यात आलं आहे, जे युजर्ससाठी डोकेदुखी ठरू शकतं. Poco C75 5G मध्ये NSA (नॉन स्टँडअलोन) सपोर्ट देण्यात आलेला नाही. यात फक्त SA (स्टँडअलोन) सपोर्ट आहे. या फोनमध्ये यूजर्स फक्त Jio चे 5G सिम वापरू शकतील. यामध्ये युजर्सना Airtel चे 5G सिम वापरता येणार नाही. त्यामुळे जिओ व्यतिरिक्त जे युजर्स हा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असतील त्यांना त्यांचे सिमकार्ड बदलावे लागेल.
आपल्या देशात पहिला SA (स्टँडअलोन) आणि दुसरा NSA (नॉन-स्टँडअलोन) असे दोन प्रकारचे 5G नेटवर्क आहेत. जिओचे स्टँडअलोन नेटवर्क आहे, त्यामुळे जिओ वापरकर्त्यांना या नवीन स्मार्टफोनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पण एअरटेलकडे नॉन-स्टँडअलोन नेटवर्क आहे, ज्याला फोन सपोर्ट करत नाही. त्यामुळे जर एअरटेल युजर्स हा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असतील त्यांना त्यांचा फोन नंबर जिओमध्ये पोर्ट करावं लागेल किंवा नवीन सिम कार्ड खरेदी कारवं लागेल.
आज 19 डिसेंबर रोजी Poco C75 5G स्मार्टफोनची पहिली सेल सुरु होणार आहे. Poco C75 5G ची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. जे त्याच्या सिंगल 4GB + 64GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ही मर्यादित कालावधीसाठी ऑफर केलेली किंमत आहे. ग्राहक Aqua Blue, Enchanted Green आणि Silver Stardust कलर पर्यायांमध्ये हा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतील. दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची पहिली सेल सुरु होणार आहे.
डिस्प्ले: POCO C75 मध्ये 1640 सह 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
प्रोसेसर: फोनमध्ये ग्राफिक्ससाठी ॲड्रेनो GPU सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 चिपसेट आहे.
OS: हँडसेट Android 14 आधारित HyperOS कस्टम स्किनवर चालतो. कंपनी दोन वर्षांचे ओएस अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी पॅच जारी करेल.
Year Ender 2024: तुम्ही Google वर यावर्षी कोणत्या शब्दांचे अर्थ शोधले? जाणून घ्या मजेदार उत्तर
कॅमेरा: POCO C75 5G मध्ये f/1.8 अपर्चर आणि दुय्यम सेन्सरसह 50MP सोनी प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, आम्हाला समोर 5MP शूटर मिळतो.
बॅटरी: फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5160mAh बॅटरी आहे.
इतर: सुरक्षेसाठी, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, स्प्लॅश संरक्षणासाठी IP52 रेटिंग आणि 120 टक्के सुपर व्हॉल्यूमसह एकल स्पीकर आहे.