Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech tips: हा सीक्रेट नंबर शेअर करणं पडेल महागात, क्षणार्धात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट

बनावट वेबसाइट स्कॅमर एखाद्या आवडत्या वेबसाइटचा क्लोन तयार करून लोकांकडून ओटीपी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुमचा ओटीपी कोणत्याही परिस्थितीत कोणात्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 19, 2025 | 11:44 AM
Tech tips: हा सीक्रेट नंबर शेअर करणं पडेल महागात, क्षणार्धात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट

Tech tips: हा सीक्रेट नंबर शेअर करणं पडेल महागात, क्षणार्धात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट

Follow Us
Close
Follow Us:

आपण बँकेचे कोणतेही व्यवहार करताना आपल्याला बँकेद्वारे एक नंबर पाठवला जातो. जोपर्यंत आपण हा सीक्रेट नंबर आपल्या ट्रांझेक्शनमध्ये अ‍ॅड करत नाही, तोपर्यंत आपला व्यवहार पूर्ण होत नाही. कोणताही व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेने शेअर केलेला हा सीक्रेट नंबर फार महत्त्वाचा असतो. वापरकर्त्याची ओळख पडताळण्यासाठी बँकेद्वारे हा सीक्रेट नंबर आपल्याला पाठवला जातो. या सीक्रेट नंबरला ओटीपी म्हणतात.

Refurbished Laptop खरेदी करण्याचा विचार करताय? या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा, कधीही होणार नाही फसवणूक

आपण कोणताही व्यवहार करताना बँक आपल्याल मोबाईल नंबरवर एक ओटीपी सेंड करते. ज्यामुळे तुमचे व्यवहार सुरक्षितपणे केले जाऊ शकतील. ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड. पण सध्या ओटीपी स्कॅम सर्रास घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांच्याकडून ओटीपी मिळवतात. तुम्ही जर तुमचा बँक ओटीपी सायबर गुन्हेगारांसोबत शेअर केला, तर क्षणार्धात तुमचं अकाऊंट रिकामं होईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकतं. (फोटो सौजन्य – pinterest) 

ओटीपी स्कॅम हा फ्रॉडचा एक प्रकार आहे ज्यामध्ये स्कॅमर लोकांकडून त्यांचा वन-टाइम पासवर्ड मिळवण्याचा प्रयत्न करतात. ओटीपी मोबाईल नंबर किंवा ईमेलवर पाठवला जातो आणि तुमच्या ऑनलाइन अकाऊंटमध्ये लॉग इन करण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी वापरला जातो. परंतु, अनेक वेळा सायबर गुन्हेगार लोकांना फसवून ओटीपी जाणून घेतात आणि नंतर त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये प्रवेश करून पैसे उकळतात. अशा घटनांमध्ये सामान्य लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ओटीपी स्कॅम कसा काम करतो आणि तुम्ही ते कसे टाळू शकता, याबद्दल जाणून घेऊया.

ओटीपी स्कॅम नक्की कसा घडतो?

फिशिंग – सायबर गुन्हेगार अनेकदा लोकांना ईमेल किंवा टेक्स्ट संदेश पाठवून, बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा ओटीपी मिळवण्याचा प्रयत्न करतात.

कॉल करणे – फसवणूक करणारे लोकांना कॉल करून वैयक्तिक तपशील आणि ओटीपी मिळवण्याचा प्रयत्न करतात.

बनावट वेबसाइट – बनावट वेबसाइट स्कॅमर एखाद्या आवडत्या वेबसाइटचा क्लोन तयार करतात आणि लोकांना त्यात लॉग इन करण्यास सांगतात आणि नंतर ओटीपी मिळवण्याचा प्रयत्न करतात.

ओटीपी घोटाळा कसा टाळायचा?

ओटीपी कधीही शेअर करू नका – तुमचा ओटीपी कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही शेअर करू नका, मग ती व्यक्ती कोणीही असो.

अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलला उत्तर देऊ नका – जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि तो तुमचा ओटीपी विचारत असेल, तर कॉल डिस्कनेक्ट करा.

तुमचा फोन अपडेट ठेवा – तुमच्या मोबाईल फोनवर किंवा संगणकावर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल करा आणि ते नियमितपणे अपडेट करा.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) वापरा – जिथे शक्य असेल तिथे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा. हे तुमच्या अकाऊंटची सुरक्षितता आणखी मजबूत करते.

नंबर सेव्ह न करताही दिसणार कॉलरचं नाव, ही नवीन सर्व्हिस लवकरच होणार सुरू; सरकारचे टेलिकॉम कंपन्याना आदेश

बँक खाते नियमितपणे तपासा – तुमचे बँक खाते नियमितपणे तपासा आणि कोणत्याही अनधिकृत व्यवहारांबद्दल तुमच्या बँकेला त्वरित कळवा.

Web Title: Tech tips dont share your otp with anyone it may cause to empty your bank account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • otp
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

भारतीय फोन नंबर फक्त 10 अंकिच का असतो? कमी जास्त का नाही होत डिजिट्स? जाणून घ्या अंकाचं अनोखं गणित
1

भारतीय फोन नंबर फक्त 10 अंकिच का असतो? कमी जास्त का नाही होत डिजिट्स? जाणून घ्या अंकाचं अनोखं गणित

ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान
2

ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान

Diwali 2025: दिवाळीत फटाक्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचाय? या टिप्स तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर
3

Diwali 2025: दिवाळीत फटाक्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचाय? या टिप्स तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर

Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर
4

Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.