आता क्रेडीट कार्डने करा UPI पेमेंट, ही आहे लिंक करण्याची सोपी प्रोसेस! जाणून घ्या सविस्तर
ऑनलाईन व्यवहारांची संख्या प्रचंड वाढली आहे. कॅश बाळगणं, सुट्टे पैसे, या सर्व समस्यांवर उपाय म्हणून आता बरेच लोकं यूपीआयचा वापर करत आहेत. दिवसेंदिवस यूपीआय युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे, ज्यामुळे यूपीआय व्यवहारांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये, UPI व्यवहारांची संख्या 16.73 अब्ज झाली आहे, जी मागील महिन्याच्या तुलनेत 8 टक्क्यांनी अधिक आहे. डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे.
अरे देवा! iPhone 16 युजर्सची नवीन समस्या, ॲपलच्या कम्युनिटी डिस्कशन पेजवर तक्रारींचा महापूर
यूपीआय ॲप्सचा आता आणखी एक फायदा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यूपीआय ॲप्सच्या मदतीने आता तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट देखील करू शकता. यामुळे पैशांचे व्यवहार अधिक सोपे होतील. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड यूपीआयसोबत लिंक करू शकाल आणि त्यानंतर तुम्ही यूपीआय ॲप्सव्दारे क्रेडिट कार्ड पेमेंट देखील करू शकाल. (फोटो सौजन्य – pinterest)
सध्या फक्त RuPay क्रेडिट कार्ड यूपीआयसोबत लिंक केले जाऊ शकतात. पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, एसबीआय कार्ड्स, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक यासारख्या अनेक बँका ही सुविधा देतात. RuPay कार्ड BHIM, Paytm आणि Google Pay सारख्या लोकप्रिय यूपीआय ॲप्सशी जोडले जाऊ शकतात. ज्यामुळे तुमचा ऑनलाईन व्यवहार अधिक सोपा होतो.
यूपीआयद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही त्वरित पैसे पाठवू शकता आणि सहज पेमेंट करू शकता. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचा कार्ड क्रमांक टाकण्याची गरज नाही. परंतु, तुम्ही काळजीपूर्वक खर्च करावा आणि क्रेडिट मर्यादा ओलांडू नये. अन्यथा तुम्हाला क्रेडीट कार्डचे जास्तीचे बिल भरावे लागू शकते.
नेहमी मजबूत पासवर्ड वापरा आणि यूपीआय ॲप्स फक्त विश्वसनीय ॲप्सवरूनच डाउनलोड करा. यूपीआयद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट करणे खूप सोपे आहे, परंतु तुम्ही नेहमी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा तुमचा फार खर्च होऊ शकतो.