ऑक्टोबरपासून बदलणार नियम! तुमच्या भागात कोणती सर्व्हिस देत आहे टेलिकॉम कंपनी? अशाप्रकारे कळेल
मोबाइल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून टेलिकॉम क्षेत्रातील नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रात कोणती मोबाइल सेवा – 2G, 3G, 4G किंवा 5G उपलब्ध आहे हे जाणून घेणे सोपे होणार आहे. नवीन नियमांनुसार, सर्व दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती अनिवार्यपणे प्रदर्शित करावी लागेल, जेणेकरून ग्राहक त्यांच्या गरजेनुसार योग्य सर्व्हिस निवडू शकतील.
बऱ्याच वेळा, तीच कंपनी एखाद्या शहरात 5G सर्व्हिस देऊ शकते, तर लहान शहरात ती फक्त 2G सर्व्हिस देत असेल, दूरसंचार कंपन्या आता त्यांच्या सर्विसच्या गुणवत्तेशी संबंधित अनेक मानकांची माहिती त्यांच्या वेबसाइटवर प्रदान करतील. आतापर्यंत अशी कोणतीही माहिती टेलिकॉम कंपन्यांनी सार्वजनिकरित्या दिली नव्हती.
हेदेखील वाचा – BSNL युजर्ससाठी आनंदाची बातमी! 35 हजार 4G साईट लाइव्ह, सरकारचा स्वस्त इंटरनेट प्लॅन, मोफत मिळेल 4G सिमकार्ट
1 ऑक्टोबरपासून, केवळ सुरक्षित URL आणि OTP लिंक असलेले संदेश संचारासाठी पाठवण्याची परवानगी असेल. याव्यतिरिक्त, TRAI ने त्यांचे निरीक्षण सुलभ करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत 140 सिरीजपासून सुरू होणारे सर्व टेलिमार्केटिंग कॉल डिजिटल लेजर प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हे नवीन नियम ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरतील, कारण त्यांच्या क्षेत्रात कोणती सर्व्हिस उपलब्ध आहे आणि कोणत्या कंपनीची सर्व्हिस सर्वात दर्जेदार आहे हे जाणून घेणे त्यांना सोपे जाईल. त्यामुळे याच्या मदतीने ते आपल्या सोईची आणि फायद्याची सर्व्हिस निवडू शकतील.
हेदेखील वाचा – Emoji पाठवल्यास होऊ शकते जेल! या देशात आहे विचित्र नियम, उल्लंघन केल्यास भरावा लागेल 1 लाख रुपयांचा दंड
ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या ऑनलाइन सर्व्हिस सुधारण्यास सांगितले आहे. या निर्देशांतर्गत मोबाईल टेलिफोन सेवा नियम 2009, वायरलेस डेटा गुणवत्ता नियम 2012 आणि ब्रॉडबँड सेवा नियम 2006 ला एकत्रित आणण्यात आले आहेत. हा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृती वेब साइटवर जाऊन त्यांच्या भागात कोणती सर्व्हिस उत्तम आहे ते चेक करू शकतात.