फोटो सौजन्य - सोशल मिडीया
हल्ली आपण अनेक कामं रोबोटच्या मदतीनं करतो. माणसांप्रमाणे रोबोट देखील सगळी कामं अगदी अचूक करू शकतो. हॉटेल्समध्ये वेटर्स म्हणून, जेवण बनविण्साठी किंवा घरातील काम करण्यासाठी, अनेक वृध्द जे घरी एकटे असतात त्यांचा सोबती म्हणून, घराची साफसफाई करण्यासाठी, जेवण किंवा चहा – नाश्ता सर्व्ह करण्यासाठी रोबोट्सचा वापर केला जातो. आज असं कोणतही काम नाही, जे रोबोट करू शकत नाही. माणसांप्रमाणे रोबोट देखील प्रत्येक काम करू शकतो. पण रोबोट माणसाप्रमाणे भावना व्यक्त करू शकतो का?
जगातील पहिला ‘इमोशनल’ रोबोट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता रोबोट माणसांप्रमाणेच हसू शकतो, रडू शकतो, त्याच्या भावना व्यक्त करू शकतो. आपण कधी विचार देखील केला नसेल माणसांप्रमाणे प्रत्येक काम करणारा रोबोट आता त्यांच्यासारखा भावना देखील व्यक्त करणार आहे. चीनमध्ये हा रोबोट लाँच करण्यात आला आहे. चीनमधील वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, हा ‘इमोशनल’ रोबोट माणसांच्या भावना समजून त्याप्रमाणे प्रतिक्रिया देवू शकतो. Guanghua No 1 असं या ‘इमोशनल’ रोबोटचं नाव आहे. चीनमधील वैज्ञानिकांच्या या प्रयोगावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
World Artificial Intelligence Conference मध्ये चीनमधील वैज्ञानिकांनी Guanghua No 1 हा पहिला ‘इमोशनल’ रोबोट लाँच केला आहे. फुडान युनिर्वर्सिटीमध्ये या रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. Guanghua No 1 या ‘इमोशनल’ रोबोटमध्ये आनंद, राग, दु:ख आणि प्रसन्नता अशा चार भावना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. Guanghua No 1 माणसांच्या भावना ओळखून त्याप्रमाणे प्रतिक्रिया देणार आहे.
फुडान युनिव्हर्सिटीचे डेप्युटी डीन Gan Zhongxue यांनी सांगतिलं की, हा रोबोट वृद्धांसाठी खूप फायदेशीर आहे. हा ह्युमनॉइड रोबोट वृद्धांची सेवा करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा रोबोट माणसांच्या शारीरिक गरजाच नव्हे तर त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याचीही काळजी घेणार आहे. जगातील पहिला ‘इमोशनल’ रोबोट पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.