फोटो सौजन्य - acer
लोकप्रिय टेक कंपन्या OnePlus आणि Xiaomi ला टक्कर देण्यासाठी आता पुन्हा एकदा Acer भारतात एंट्री करणार आहे. आता तुम्हाला भारतातीय बाजारात Acer चे स्मार्टफोन पुन्हा एखदा पाहायला मिळणार आहेत. Acer ने वर्षभरापूर्वी भारतीय बाजारपेठेत आपल्या स्मार्टफोनची विक्री थांबवली होती, परंतु आता ती पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. त्यामुळे Acer युजर्स मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. बंगळुरू स्थित स्टार्टअप Indkal Technologies ने Acer ब्रँडेड स्मार्टफोनसाठी करार केला आहे. त्यामुळे आता Acer भारतीय बाजारपेठेत दमदार एंट्री करणार आहे.
Indkal Technologies ने केलेल्या करारानुसार ही कंपनी Acer ब्रँडेड स्मार्टफोनचे डिझाईन, निर्मिती आणि लाँचिंग करणार आहे. त्यामुळे आता भारतीय बाजारपेठेत लवकरच Acer चे ब्रँडेड स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत 15 हजार ते 50 हजार रुपयांच्या दरम्यान असेल. कंपनीला भारतात मिड रेंज स्मार्टफोन्सपासून सुरुवात करायची आहे. त्यामुळे कंपनी Vivo, Redmi, OnePlus, iQOO सारख्या ब्रँडशी थेट स्पर्धा करणार आहे. Vivo, Redmi, OnePlus, iQOO हे ब्रँड भारतात लोकप्रिय आहेत. अशातच आता त्यांच्या स्पर्धा करण्यासाठी आणखी एक कंपनी भारतीय बाजारपेठेत एंट्री करणार आहे. ग्राहकांची Vivo, Redmi, OnePlus, iQOO या कंपन्यांना असणारी लोकप्रियता पाहता Acer ला काहीतरी नवीन घेऊन बाजारात एंट्री करावी लागेल.
Acer Inc च्या ग्लोबल स्ट्रॅटेजिक अलायन्स चे वायस प्रेसिडेंट Jade Zhou यांनी सांगितलं की, Indkal Technologies भारतात Acer ब्रँडेड स्मार्टफोन्सचे डिझाईन, निर्मिती आणि लाँचिंग करणार आहे. यासाठी आम्ही प्रचंड उत्साहित आहोत. Acer ब्रँडेड स्मार्टफोन्सच्या लाँचिंगमुळे अँड्रॉईड युजर्सना अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि त्यांना अधिक चांगला अनुभव मिळेल. Indkal Technologies भारतात तयार करणारे Acer ब्रँडेड स्मार्टफोन्स मेड इन इंडिया उपक्रमाचा भाग असतील. यामध्ये प्रगत सॉफ्टवेअर तंत्रज्ञान उपलब्ध असेल. दरवर्षी 10 लाख स्मार्टफोन्स तयार करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. Acer ब्रँडेड स्मार्टफोन्स ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पध्दतीने बाजारात उपलब्ध असतील.
1987 मध्ये आपल्या स्थापनेनंतर Acer ब्रँडचे मिशन लोकांना तंत्रज्ञानात येणारे अडथळे दूर करणे आहे. आम्ही उत्साहित आहोत की Indkal Technologies भारतात या मिशनला पुढे वाढवत आहे. या मिशन अंतर्गत Indkal Technologies भारतात Acer ब्रँड स्मार्टफोन सीरीज लाँच करेल, असा दावा Acer Inc च्या ग्लोबल स्ट्रॅटेजिक अलायन्स चे वायस प्रेसिडेंट Jade Zhou यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Acer आणि Indkal Technologies यांच्यातील हे दुसरे प्रोजेक्ट आहे. यापूर्वी Acer ने 2021 मध्ये ब्रँडिंग स्मार्ट टीव्ही लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनी भारतात ब्रँडेड स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यामुळे आता भारतीय बाजारपेठेत लवकरच Acer चे ब्रँडेड स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत.