Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेलिकॉम कंपन्यांचे पूर्वीचे रिचार्ज प्लॅन पुन्हा सुरु होणार? TRAI मे मांडला एक खास प्रस्ताव

आता ग्राहकांचा विचार करता दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने एक प्रस्ताव सादर केला आहे, ज्या अंतर्गत युजर्स जुन्या काळाप्रमाणे फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएस योजनेचा लाभ घेऊ शकतील. भारतातील जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या बहुतेक योजनांमध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात. जरी युजर्सना इंटरनेट डेटाची आवश्यकता नसली तरीही, त्यांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट असतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2024 | 09:22 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

काही वेळा आपल्याला फक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा पाहिजे असते. पण कंपन्यांच्या नवीन टॅरिफ प्लॅनमुळे ग्राहकांना कंपनीचा संपूर्ण रिचार्ज प्लॅन विकत घ्यावा लागत आहे, ज्यामध्ये इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि OTT प्लॅटफॉर्मची सुविधा दिली जाते. अशा परिस्थितीत, अनेक वापरकर्त्यांना इंटरनेट डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मची आवश्यकता नाही. त्यांना फक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसच्या सुविधेची गरज आहे, परंतु तरीही त्यांना या सर्व फायद्यांसह योजना खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे ग्राहकांचे अनावश्यक पैसे वाया जातात. त्यामुळे आता ग्राहकांचा विचार करता दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने एक प्रस्ताव सादर केला आहे, ज्या अंतर्गत युजर्स जुन्या काळाप्रमाणे फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएस योजनेचा लाभ घेऊ शकतील.

हेदेखील वाचा- कसा होतो ऑनलाईन फ्रॉड? ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी ‘या’ टीप्स फॉलो करा

भारतातील जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या बहुतेक योजनांमध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात. जरी युजर्सना इंटरनेट डेटाची आवश्यकता नसली तरीही, त्यांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट असतो. एखादा युजर इंटरनेट डेटा वापरत नसला तरीही त्याला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात या कारणास्तव TRAI ने आता एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे, ज्या अंतर्गत दूरसंचार कंपन्यांना जुन्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएससह योजना सुरू करण्यास सांगितले आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना महागड्या रिचार्ज प्लॅनसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

हेदेखील वाचा- Vodafone-idea युजर्सना दिलासा! कपंनीने सर्वात स्वस्त प्लॅनची केली घोषणा

TRAI ने यासाठी सल्लापत्र जारी केले आहे. TRAI ने टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन 2012 च्या पुनरावलोकनावर हे सल्ला पत्र जारी केलं आहे. TRAI ने या प्रस्तावावर आपल्या भागधारकांचे मत मागवले आहे. TRAI चा हा प्रस्ताव सामान्य वापरकर्त्यांसाठी एक मोठे पाऊल ठरू शकतो. आता TRAI चा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो. सामान्य लोकांना रिचार्ज प्लॅनसाठी खूप पैसे खर्च करावे लागतात.

अलिकडेच देशभरातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या jio, airtel आणि vi यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली. JIO ने त्यांच्या प्रीपेड टॅरिफ प्लॅनच्या किमतींमध्ये सुमारे २२ टक्के दरवाढ केली आहे. JIO नंतर टेलिकॉम कंपनी Airtel ने देखील त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. Airtel ने मोबाईल टॅरिफ प्लॅनमध्ये १० ते २१ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. Airtel ने प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. JIO – Airtel नंतर टेलिकॉम कंपनी Vodafone-idea ने देखील डेटा प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. Vodafone-idea ने त्यांच्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमती ११ ते २३ टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपन्यांच्या वाढत्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतींमुळे ग्राहकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या वाढत्या रिचार्ज प्लॅनच्या काळात TRAI चा हा प्रस्ताव सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे.

Web Title: Trai proposal for telecom companies to launch only unlimited voice calls and sms recharge plans again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 09:22 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.