UPI करण्यापूर्वी हा ऑप्शन बंद करा नाहीतर ऑटोमॅटिक बँक खात्यातून पैसे कट होतील
आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण UPI वापरतो. वीज, पाणी, गॅस, इंटरनेट आणि इतर गोष्टींसाठी पैसे देण्यासाठी UPI चा वापर केला जातो. या याच्या मदतीने आपण घरबसल्या ऑनलाईन पेमेंट करू शकतो. युपीआयचा आपण नियमित वापर करत असतो, हेच कारण आहे की आम्ही त्यात UPI ऑटोपे ऍक्टिव्ह करतो. परंतु काहीवेळा अशा गोष्टींमुळे युजर्सना काही समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकांच्या फोनमध्ये युपीआय ऑटो पे ऍक्टिव्ह आहे मात्र त्यांना आता ते बंद करायचे आहे. हे कसे करावे याबाबत अनेकांना माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला UPI ऑटोपे मोबाइल मधून रद्द कसे करावे याविषयी माहिती देत आहोत. चला तर मग आम्ही तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सांगतो
हेदेखील वाचा – वैज्ञानिकांची कमाल! आता स्वप्ने रेकॉर्ड करेल ही मशीन, झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचा पाहू शकता व्हिडिओ
एकदा पेमेंट हटवल्यानंतर, पेमेंट आपोआप तुमच्या खात्यातून कापले जाणार नाही. ऑटो पे म्हणजे पेमेंट तुमच्या खात्यातून आपोआप कापले जाणे. सर्वात मोठी अडचण अशी आहे की तुम्ही ऑटो पे वापरल्यास, बँक खात्यातून पैसे आपोआप कापले जातात. याबाबत विसरल्याने तुमचे जास्त नुकसान होते. अशा परिस्थितीत, तुम्ही हा पर्याय बंद केल्यास, पेमेंट खात्यातूनच कापले जाणार नाही.
हेदेखील वाचा – ऑक्टोबरपासून बदलणार नियम! तुमच्या भागात कोणती सर्व्हिस देत आहे टेलिकॉम कंपनी? अशाप्रकारे कळेल
UPI पेमेंट करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती असायला असणे आवश्यक आहे. जेव्हाही तुम्ही UPI पेमेंट करता, तेव्हा निश्चितपणे चेक करा की इतर काही ऑप्शन येथे येऊ नयेत. UPI पेमेंटच्या मदतीने तुमचे काम खूप सोपे होते जे सहज पेमेंट करण्यास मदत करते.