UPI वापरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यासोबतही होऊ शकतो स्कॅम, कधीही करू नका ही चूक
भारतात UPI सर्वाधिक वापरले जाते. NPCI च्या म्हणण्यानुसार, UPI पेमेंट करणाऱ्या लोकांच्या संख्येत तसेच त्याद्वारे केलेल्या पेमेंटच्या संख्येत आता विक्रमी वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंट करणारे बहुतांश युजर्स UPI ला प्राधान्य देत आहेत. त्याच्या लोकप्रियतेमुळे यूपीआयशी संबंधित अनेक घोटाळेही समोर येत आहेत. हा घोटाळे केवळ सामान्य युजर्ससोबतच केले जात नाही, तर स्कॅमर्स व्यापाऱ्यांची म्हणजेच UPI पेमेंट स्वीकारणाऱ्यांचीही फसवणूक करत आहेत. ही बाब फार चिंताजनक असून आज आम्ही तुम्हाला युपीआय स्कॅम्सपासून आपल्याला सुरक्षित कसं करायचं यासाठीच्या काही टिप्स सांगणार आहोत.
काही गोष्टींची वेळीच काळजी घेतली नाही तर हॅकर्स तुमची मोठी फसवणूक करू शकतात. डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने गेल्या काही वर्षांत ऑनलाइन पेमेंट करण्याची पसंती पूर्णपणे बदलली आहे. ऑनलाइन पेमेंटच्या वाढत्या संख्येमुळे डिजिटल फसवणुकीतही तुफान वाढ झाली आहे.
अशाप्रकारे केली जात आहे फसवणूक
अलीकडच्या काळात उघडकीस आलेली प्रकरणे पाहिल्यास, स्कॅमर UPI व्यवहार इंटरफेससह बनावट ॲप्स वापरत आहेत. हे इंटरफेस इतके वास्तविक दिसतात की आपण चुका देखील करू शकता. यामध्ये बनावट ट्रानजॅक्शन दाखवून मर्चंट्सची फसवणूक केली जाते. याशिवाय स्कॅमर ऑटोपे फीचर आणि क्यूआर कोड रिप्लेसमेंट सारख्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. तथापि आम्ही तुम्हाला सांगतो की, आपण घेतलेली दक्षता आपल्याला अशा घोटाळ्यांपासून वाचवू शकते.
या गोष्टी ध्यानात असूद्यात