
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
व्हिज्युअल सोल्यूशन्समधील जागतिक अग्रेसर कंपनी व्ह्यूसॉनिकने भारतातील कलरप्रो ॲवॉर्ड्स २०२४ एक्झिबिशन: मोमेंटम कार्यक्रमात आज आपल्या अत्याधुनिक मॉनिटर्सच्या श्रृंखलेचे अनावरण केले. ही नव्या श्रेणीतील उत्पादने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनन्यसाधारण कामगिरीने सुसज्ज असून ती खासकरून व्यावसायिक, आधुनिक कार्यस्थळे आणि गेमर्ससाठी तयार करण्यात आलेली आहेत. त्यातील मुख्य वैशिष्ट्यांत एक एआय मॉनिटर, अतिवेगवान गेमिंग मॉनिटर्स आणि एक ५के डिस्प्ले मॉनिटरचा समावेश आहे. क्रिएटर्स, विशेषत्वाने मॅक युजर्ससाठी त्यात स्वयंचलित कलर कॅलिबरेशन देण्यात आले आहे. हे सर्व मॉनिटर्स अप्रतिम दृश्य गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत.
मॉनिटर्स श्रेणी
अत्याधुनिक मॉनिटर्सच्या श्रेणीत व्हीजी२७४८ए-२के, व्हीपी२७८८-५के, व्हीपी२७७६टी-४के आणि व्हीपी३२७६टी-४के थंडरबोल्ट™ ४, व्हीपी३२८५-४के-ओएलइडी, एक्सजी३२५डी-४के-ओएलइडी आणि एक्सजी२७३७ आदी उत्पादने सादर करण्यात आली आहेत.
XG325D-4K-OLED
XG325D-4K-OLED मध्ये 32-इंचाचा 4K UHD OLED डिस्प्ले आहे आणि तो ड्युअल मोड देतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना 240Hz वर 4K किंवा 480Hz वर FHD मध्ये स्विच करण्याची परवानगी मिळते. यात AMD FreeSync प्रीमियम आणि इतर विविध प्रगत वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत.
VP2788-5K
ViewSonic मॅक वापरकर्त्यांसाठी VP2788-5K आणत आहे, ज्यामध्ये 218 PPI (पिक्सेल प्रति इंच) वर 5K रिझोल्यूशन आहे. त्यात थंडरबोल्ट 4 कनेक्टिव्हिटी, ड्युअल 5K डेझी-चेनिंग क्षमता आणि इतर विविध वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत.
XG2737
XG2737 हा 27-इंचाचा FHD IPS मॉनिटर आहे ज्याचा रिफ्रेश रेट 520Hz रिफ्रेश रेट आणि 1ms MPRT रिस्पॉन्स टाइम आहे. दोन्ही मॉनिटर्समध्ये बिल्ट-इन स्पीकर्ससह विविध कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.
आजच्या वापरकर्त्यांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन
व्ह्यूसॉनिकमध्ये मॉनिटर बिझनेस युनिटचे महाव्यवस्थापक ऑस्कर लिन म्हणाले की, “आम्ही आमच्या नवीन मॉनिटर्सची श्रृंखला सादर करण्यासाठी खूप उत्सुक आहोत, जी नवकल्पना आणि वापरकर्ता केंद्रीत डिझाइनसाठी आमची अढळ वचनबद्धता दर्शवते. आजच्या युगातील कार्यस्थळांसाठी इंटेलिजेंट सेन्सिंगयुक्त एआय मॉनिटरपासून ते विद्युतगती गेमिंग डिस्प्लेज; आणि सृजनशील व्यावसायिकांसाठी अत्याधुनिक सोल्यूशन्सपर्यंत, आमची ही नवीन श्रेणी आजच्या वापरकर्त्यांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एआय आणि थंडरबोल्ट™ ४ सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानांची सांगड घालून आम्ही वापरकर्त्यांचा अनुभव, उत्पादकता आणि सृजनशीलतेला नव्या उंचीवर नेणे कायम ठेवणार आहोत.”
सृजनशीलता, व्यवसाय आणि गेमिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मॉनिटर्सची मालिका
व्ह्यूसॉनिकमध्ये आयटी डिव्हिजनमधील विक्री आणि मार्केटिंगचे संचालक संजॉय भट्टाचार्य म्हणाले की, “जागतिक स्तरावरील पाचव्या वर्षातील माइलस्टोनचा भाग म्हणून भारतातील कलरप्रो पुरस्कारांचे पहिलेवाहिले स्थानिक प्रदर्शन आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला भारतीय प्रेक्षकांच्या जवळ आणण्यासाठी हा सृजनशीलता आणि नवकल्पनांचा सोहळा आमच्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही मॉनिटर्सची जी व्यापक मालिका सादर करत आहोत ती सृजनशीलता, व्यवसाय आणि गेमिंगच्या क्षेत्रांतील भारतीय वापरकर्त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून आम्ही उत्पादकता आणि वापरकर्त्यांचा अनुभव वृद्धिंगत करणारे सोल्यूशनची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”