WhatsApp वर स्कॅमर्सकडून मेसेज येत असतील तर सावध व्हा (फोटो सौजन्य- pinterest)
WhatsApp हे सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग ॲप आहे. जगभरातील लोकं WhatsApp फोटो, व्हिडीओ आणि त्यांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स शेअर करण्यासाठी WhatsApp चा वापर करतात. WhatsApp साठी त्यांच्या युजर्सची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. WhatsApp युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर लाँच करत असतो ज्यामुळे त्यांच्या युजर्सची सुरक्षा टीकून राहिल. WhatsApp वरील End-to-end encryption युजर्सना त्यांचे चॅट्स सुरक्षित असल्याची जाणीव करून देते.
हेदेखील वाचा- WhatsApp stickers आणि GIF चा वापर करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवायच्या आहेत? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
पण सध्या WhatsApp वरूनच लोकांची फसवणूक करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्कॅमर्स WhatsApp युजर्सना फ्रॉड मॅसेज पाठवतात, काही युजर्स ह्या मॅसेजना बळी पडतात. या सर्व गोष्टींचा विचार करता आता कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे. या अलर्टमध्ये WhatsApp ने त्यांच्या युजर्सना फ्रॉड मॅसेजपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच स्कॅमर्सकडून आलेले हे फ्रॉड मॅसेज ओळखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी कंपनीने काही उपाय देखील शेअर केले आहेत.
कंपनीने आपल्या हेल्प सेंटरच्या माध्यमातून लोकांना असे संदेश टाळण्याचा इशारा दिला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, स्कॅम मॅसेज तुमच्या ओळखीच्या किंवा अनोळखी कोणत्याही प्रकारच्या लोकांकडून येऊ शकतात. अशा परिस्थितीत, आपण थोडं अधिक सावध राहणं गरजेचं आहे आणि असे संदेश ओळखण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही मुद्दे लक्षात ठेवावे लागतील, ज्याच्या मदतीने तुम्ही स्कॅमर्सकडून आलेले मॅसेज ओळखू शकाल. ज्यामुळे स्कॅम आणि फ्रॉड मॅसेजना युजर्स बळी पडणार नाहीत.
हेदेखील वाचा- WhatsApp DP सोबत दिसणाऱ्या QR Code चं नक्की काम काय? जाणून घ्या सविस्तर
अनेकदा स्कॅमर्सकडून आलेल्या मॅसेजमध्ये टायपिंग मिस्टेक्स किंवा व्याकरणाच्या चुका पाहायला मिळतात. तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून आलेले मॅसेज संशयास्पद वाटत असल्यास तात्काळ त्या नंबरला ब्लॉक करा.
स्कॅम मॅसेज तुम्हाला एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास किंवा ॲप डाउनलोड करण्यास सांगतात. याशिवाय काहीजण तुमची वैयक्तिक माहिती जसं की, क्रेडिट कार्ड किंवा बँक खाते तपशील, जन्मतारीख किंवा पासवर्ड शेअर करायला सांगतात. ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. कोणत्याही व्यक्तिसोबत आपले क्रेडिट कार्ड किंवा बँक खाते तपशील अथवा पासवर्ड शेअर करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
WhatsApp वर अनोखळी नंबरवरून मॅसेज आल्यास समोरची व्यक्ति जर तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल तर सावध व्हा. तुमची एक चूक आणि तुमचं बँक खातं रिकामं होईल. काहीवेळा स्कॅमर्स एखाद्या अनोखळी नंबरवरून मॅसेज करून आपल्याला ओळखत असल्याचा दावा करतात. कोणत्याही अनोळखी नंबरवरून मॅसेज आल्यास सर्वात आधी समोरची व्यक्ति आपल्या ओळखीची आहे की नाही, याची खात्री करा आणि त्यानंतरच संवाद पूर्ण करा.
अनेक स्कॅमर्स युजर्सची फसवूणक करण्यासाठी पैशांचं आमिष देतात. जसं की लॉटरी, जुगार, नोकरी, गुंतवणूक. यामुळे युजर्स सहजपणे स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात आणि फ्रॉडचे शिकार होतात.