फोटो सौजन्य - pinterest
आजच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेले मॅसेजिंग ॲप म्हणजे WhatsApp. प्रोफेशनल आणि पर्सनल अशी दोन्ही कामं WhatsApp वर केली जातात. कॉलेज, स्कुल, फॅमिली आणि ऑफीस असे अनेक ग्रुप आपल्या WhatsApp वर जोडलेले असतात. WhatsApp च्या मदतीने कोणत्याही व्यक्तिसोबत संवाद साधणं अगदी सहज शक्य होतं. WhatsApp आपल्या रोजच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. एक दिवस जरी WhatsApp बंद झालं तर आपण बैचेन होतो. WhatsApp नसेल तर आपली अनेक कामं रखडू शकतात.
हेदेखील वाचा- अँड्रॉईड – IOS WhatsApp युजर्ससाठी कंपनी घेऊन येतेय डबल धमाका! नवीन फीचर्स पाहून व्हाल हैराण
आजच्या डिजीटल युगात WhatsApp शिवाय जगणं कठीण आहे. भारतासह अनेक देशांमध्ये WhatsApp चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आज एक असा व्यक्ति सापडणं कठीण आहे, जो WhatsApp चा वापर करत नाही. पण जर WhatsApp अचानक बंद झालं तर? तुम्ही कधी विचार केला आहे का WhatsApp बंद झालं तर काय होईल. पण WhatsApp अचानक बंदच का होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं उत्तर म्हणजे WhatsApp कंपनी लवकरच काही अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयफोन्सवर आपली सेवा बंद करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही जुने अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयफोन्स वापरत असाल तर काळजी घ्या.
हेदेखील वाचा- WhatsApp वर आंतरराष्ट्रीय नंबर वरून कॉल येत असेल तर सावध व्हा; नाहीतर ठरला सायबर फ्रॉडचे शिकार
कंपनीने एक लिस्ट जारी केली आहे, ज्या फोन्समधील WhatsApp बंद होणार आहे. तुम्ही ही यादी पाहिलीत का? या यादित तुमचा फोन तर नाही ना? या यादीमध्ये सॅमसंग, ऍपल, मोटो, Huawei आणि सोनी या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या यादीतील स्मार्टफोन्सवर कंपनी आपली WhatsApp सेवा बंद करणार आहे.
हल्ली WhatsApp सारख्या ॲपवर हॅकर्सचा धोका खूप वाढला आहे. हॅकर्स या ॲप्सद्वारे सामान्य लोकांची फसवणूक करतात. तसेत लोकांचा डेटा लिक करून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी WhatsApp ने जुन्या फोनधील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही जुन्या फोनवरही WhatsApp चालवत असाल तर तुम्ही तुमच्या WhatsApp मेसेजचा बॅकअप घ्यावा कारण जेव्हा नवीन फोनवर WhatsApp चालू होते तेव्हा तुमच्या WhatsApp मधील सर्व चॅट्स डिलीट होऊ शकतात.