AI च्या मदतीने होते ओळख, पक्ष्यांना देखील प्रतिबंध! White House मध्ये उपलब्ध आहेत या सिक्योरिटी टेक्नोलॉजी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेले व्हाईट हाऊस जगातील सर्वात सुरक्षित आणि हाय-टेक घर मानले जाते. या ईमारतीमध्ये 32 खोल्या आहेत, ज्या सर्वांमध्ये हाय टेक सिक्योरिटी उपलब्ध आहे. 32 खोल्या असलेली ही केवळ एक सामान्य इमारत नाही. यामध्ये हाय सिक्योरिटी टेक्नोलॉजी आहे. या ठिकाणी पक्ष्यांना उडण्यासाठी देखील प्रतिबंध आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: Google Maps वर दिसणारे तुमचे घर किंवा कार ब्लर करण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या
या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची ओळख आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे केली जाते. या तंत्रज्ञानामध्ये बसवलेले हाय-रिझोल्यूशन कॅमेरे आणि सेन्सर कोणतीही अज्ञात व्यक्ती किंवा संशयास्पद क्रिया ओळखतात आणि त्वरित अलर्ट पाठवतात. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हाईट हाऊसच्या सुरक्षेसाठी फेशियल रेकग्निशन सिस्टीम आणि बायोमेट्रिक स्कॅनरचा वापर केला जातो, ज्यामुळे कोणतीही अनधिकृत व्यक्ती इथे प्रवेश करू शकत नाही. व्हाईट हाऊसच्या आजूबाजूच्या सुरक्षेसाठी वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे, ज्यामध्ये तापमान सेन्सर्स, मोशन डिटेक्टर आणि इतर संवेदनशील डिव्हाईसचा समावेश आहे. या सिस्टीम अगदी लहान हालचाली देखील ओळखण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे सुरक्षा एजन्सींना त्वरित माहिती पाठविली जाऊ शकते. आणि याच्या मदतीने व्हाईट हाऊसची सुरक्षा कायम टिकून राहते.
फेशियल रेकग्निशन सिस्टीम: व्हाईट हाऊसमध्ये येणाऱ्या- जाणाऱ्या व्यक्तिंची ओळख सुनिश्चित करण्यासाठी हाय-रिझोल्यूशन कॅमेऱ्यांसह AI-आधारित फेशियल रेकग्निशन सिस्टीमचा वापर केला जातो.
बायोमेट्रिक स्कॅनर: अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी एंट्री पॉइंटवर बायोमेट्रिक स्कॅनरचा वापर केला जातो.
हेदेखील वाचा- प्रीमियम डिझाइनवाला Moto G85 स्वस्तात खरेदी करण्याची संधी! किंमत कमी पण फीचर्स दमदार
थर्मल आणि मोशन सेन्सर: अगदी लहान हालचाली आणि तापमानातील बदल शोधण्यासाठी या ठिकाणी विशेष थर्मल आणि मोशन सेन्सर बसवण्यात आले आहेत.
साइबर सिक्योरिटी सिस्टम: सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी आणि डेटाचे उल्लंघन रोखण्यासाठी एक मजबूत सायबर सुरक्षा नेटवर्क या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.
एंटी-ड्रोन टेक्नोलॉजी: इमारतीच्या आजूबाजूच्या अनधिकृत ड्रोन क्रियाकलापांचा मागोवा घेणे आणि अक्षम करणे अशी कामं एंटी-ड्रोन टेक्नोलॉजीच्या मदतीने केला जातात.
एयर-डिफेंस सिस्टम: हवाई हल्ल्यांबाबत अलर्ट देण्यासाठी एयर-डिफेंस सिस्टम वापरली जाते.
ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (GPR): भूमिगत क्रियाकलाप शोधणे आणि सुरक्षा सुनिश्चित करणे, ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारच्या मदतीने शक्य होतं.
इमर्जन्सी कम्युनिकेशन सिस्टीम: कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अधिकाऱ्यांशी संपर्कात राहण्यासाठी इमर्जन्सी कम्युनिकेशन सिस्टीम वापरली जाते.
इन्फ्रारेड आणि नाईट व्हिजन कॅमेरे: रात्रीच्या वेळीही संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ही टेक्नोलॉजी अत्यंत महत्त्वाची आहे.
ईएमपी प्रोटेक्शन (Electromagnetic Pulse Protection): सिस्टमला कोणत्याही इलेक्ट्रोमॅग्नेटिक हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर केला जतो.
या सर्व हाय-टेक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हाईट हाऊसची सुरक्षा अत्यंत मजबूत आणि सुरक्षित राहते. अशाप्रकारे, व्हाईट हाऊस केवळ आधुनिक सुरक्षा प्रणालीच नव्हे तर अत्याधुनिक AI आणि सायबर सुरक्षा वापरून जगातील सर्वात सुरक्षित आणि हाय-टेक ठिकाण बनले आहे.