फोटो सौजन्य - Social Media
मॉलमध्ये पाऊल ठेवताच आपल्या अंगावर वर जणू फटकाच मारत आहे असा आभास होतो. होणारा वाऱ्याचा वेग इतका असतो की आपले केस, कपडे सगळं काही एका क्षणासाठी उडू लागतात आणि आतमध्ये प्रवेश करताच सगळं काही नॉर्मल होतं. अनेकांना या कारणामुळे नक्कीच मॉलचे दरवाजे आवडत असतील. फक्त मॉलच नव्हे तर मोठमोठे शॉपिंग सेंटर तसेच सुपरमार्केट आणि काही इतर ठिकाणे जसे की फॅक्ट्री आणि थिएटर अशा ठिकाणांवर देखील दरवाज्याच्या इथे अशी सिस्टम पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊयात या सिस्टमबद्दल:
याला व्हेंटिलेशन सिस्टम म्हणतात. मॉल तसेच इतर ठिकाणी दरवाजांवर एअर कर्टन लावले जातात. जेणेकरून आताची हवा आत राहील आणि बाहेरील हवा बाहेर राहील. दरवाज्यावर चालू असणारा हवेची तेज गती एक भिंत म्ह्णून कार्यरत असते, जी आतील थंड वातावरणाला शाबूत ठेवण्याचे काम करते. जेव्हा आपण दरवाजा उघडतो, त्यावेळी बाहेरील हवा आत येण्याचा आणि आतील हवा बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते. पण हे एअर कर्टन या प्रयत्नांना मोडून काढतात.
दरवाज्यावर एअर कर्टन असल्यानं अतुल AC लाही वातावरण थंड करण्यात फार काही त्रास घ्यावा लागत नाही. एअर कर्टनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऊर्जेची बचत. कारण हे उपकरण एअर कंडिशनिंग सिस्टमवर कमी ताण टाकते, ज्यामुळे वीज खर्च कमी होतो आणि पर्यावरणपूरक ऊर्जा व्यवस्थापनास मदत होते. याशिवाय, हे धूळ, मच्छर, मक्खी आणि इतर हानिकारक कीटकांना आत येण्यापासून अडवते, ज्यामुळे इमारतीतील हवा स्वच्छ आणि आरोग्यदायी राहते. विशेषतः, रुग्णालये आणि खाद्यपदार्थ संबंधित ठिकाणी, जसे की रेस्टॉरंट्स आणि बेकरी, ते स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. यामुळेच अनेक औद्योगिक क्षेत्रांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी एअर कर्टनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
हे उपकरण केवळ मॉल्स आणि रेस्टॉरंट्समध्येच वापरले जाते असे नाही, तर हॉस्पिटल, लॅबोरेटरी, कारखाने आणि घरांमध्येही याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. जिथे तापमान नियंत्रण आवश्यक असते, जसे की फार्मास्युटिकल उद्योग, स्टोरेज युनिट्स आणि कोल्ड स्टोअर्स, तिथे एअर कर्टन फायदेशीर ठरते. तसेच, काही आधुनिक घरांमध्येही थंडगार आणि आरामदायक वातावरण टिकवण्यासाठी याचा वापर वाढत आहे. त्यामुळे एअर कर्टन हे केवळ एक सुविधा नसून, ऊर्जा बचतीसाठी आणि आरोग्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.