Xiaomi ने कतरिना कैफला बनवलं ब्रँड ॲम्बेसेडर! 7 वर्षांनी कतरिना Xiaomi सोबत काम करणार (फोटो सौजन्य - pinterest)
तुम्ही देखील Xiaomi युजर आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील लोकप्रिय कंपनी Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत 10 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 व्या वर्षपूर्तीनंतर कंपनीने बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला आपली नवीन ब्रँड ॲम्बेसेडर बनवली आहे. यापूर्वी देखील कतरीना आणि Xiaomi ने एकत्र काम केलं आहे. 2017 मध्ये Xiaomi ने आपल्या रेडमी वाय सीरिजसाठी कतरिना कैफची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणि तब्बल 7 वर्षांनी कंपनी आणि कतरीना एकत्र काम करणार आहेत.
हेदेखील वाचा- रात्री शांतपणे झोपण्यासाठी सुरु करा तुमच्या स्मार्टफोनचा Bedtime Mode, महत्त्वाच्या कॉलवरच मिळेल अलर्ट
Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत 10 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने Xiaomi India ने कतरिना कैफला आपली नवीन ब्रँड ॲम्बेसेडर बनवली आहे. Xiaomi आणि कतरिनाने यापूर्वीही एकत्र काम केले आहे. कंपनीने 2017 मध्ये कतरिनाला रेडमी वाय सीरिजसाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनवले होतं. त्यानंतर आता 7 वर्षांनी Xiaomi India मध्ये कतरिनाचं पुनरागमन झाले आहे. Xiaomi India ने आपल्या नवीन ब्रँड ॲम्बेसेडरची घोषणा केली आहे. कंपनीने कतरिन कैफला आपली नवीन ब्रँड ॲम्बेसेडर बनवली आहे. Xiaomi India आणि कतरिना कैफ एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही. कतरिना यापूर्वीच शाओमीची ब्रँड ॲम्बेसेडर आहे.
हेदेखील वाचा- ब्राझीलने एक्सवर बंदी घातल्यानंतर मस्कने उडवली खिल्ली,’आम्ही द्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात आहोत…’
या नवीन इनिंगमध्ये, कतरिना Xiaomi स्मार्टफोन, टीव्ही आणि टॅब्लेटची ॲम्बेसेडर असेल. Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत 10 वर्षे पूर्ण केली आहेत. कंपनीने 2014 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. Xiaomi आपल्या ग्राहकांशी संपर्क मजबूत करण्यासाठी काम करत आहे. 2014 पासून सुरु झालेल्या या प्रवासाने काही महिन्यांतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
याबबात Xiaomi इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी म्हणाले, ‘आता आम्ही भारतीय बाजारपेठेत नवनिर्मितीचे एक दशक पूर्ण केले आहे, कतरिना कैफला Xiaomi कुटुंबात परत जोडणे एक परिपूर्ण उत्सवासारखे वाटते. शाओमी आणि कतरिना या दोघांमध्ये अद्वितीय क्षमता आहे, ज्यामुळे ते लाखो लोकांशी जोडले गेले आहेत. एकत्रितपणे आम्ही प्रत्येकासाठी नवीन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणू.
यावेळी कतरिना कैफ म्हणाली, ‘मी Xiaomi सोबत पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. विशेषत: जेव्हा कंपनी भारतात 10 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. मी Xiaomi चे प्रतिनिधित्व करण्यास तयार आहे आणि Xiaomi च्या नवकल्पनांच्या जगात चाहत्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.
याआधी Xiaomi ने कतरिना कैफला वाय सीरीजसाठी साइन केले होते. कंपनीने 2017 मध्ये Redmi Y-सिरीज लाँच केली. कतरिना 7 वर्षांनंतर Xiaomi ब्रँडसोबत परतली आहे. आता कंपनी भारतीय बाजारात काही नवीन लॉन्च करते का हे पाहणे बाकी आहे.