इलेकट्रोनिक कंपन्यांच्या यादीत Xiaomi चे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीची स्थपना 2010 मध्ये करण्यात आलेली होती आणि आता ही कंपनी जगभर लोकप्रिय आणि दर्जेदार कंपन्यांपैकी एक आहे. भारतात जेव्हा चांगल्या आणि महागड्या फोनबद्दल बोलायचे केले की, आयफोन, सॅमसंग आणि वनप्लसचा विचार पहिला येतो. मात्र आता असे होणार नाही, कारण बऱ्याच वर्षांपासून Xiaomi आपले प्रीमियम स्मार्टफोन्स लाँच करत आहे, जे इतर स्मार्टफोन्सच्या निम्म्या किमतीत येतात. तसेच या फोनचे परफॉर्मन्स आणि फीचर्स महागड्या फोनच्या तुलनेत खूप चांगले आहेत. आता Xiaomi असाच एक नवीन स्मार्टफोन Xiaomi 14 Civi लाँच करणार आहे.
32MP ड्युअल कॅमेरा सेटअप
Xiaomi या कंपनीचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो 12 जून 2024 रोजी भारतात लाँच कारण्यात येणार आहे. हे Leica ऑप्टिकल लेन्स सपोर्टसह येईल. फोनमध्ये 32MP ड्युअल फ्रंट कॅमेरा असेल. त्याचे दोन्ही फ्रंट कॅमेरे 32MP चे असतील. तसेच, 50MP मुख्य रिअर कॅमेरा दिला जाईल. याशिवाय 12MP 120 डिग्री अल्ट्रा वाईड अँगल लेन्स दिली जाऊ शकतात. तसेच यात 50MP पोर्ट्रेट लेन्स देण्यात येणार आहे.
[read_also content=”दिवसभर वापरला यूट्यूब तरीही कधीच संपणार नाही तुमचा डेटा, जाणून घ्या इंटरेस्टिंग सेटिंग https://www.navarashtra.com/technology/even-if-you-use-youtube-all-day-your-data-will-never-run-out-know-the-interesting-setting-539797.html”]
दमदार प्रोसेसर सपोर्ट
हा फोन गोरिला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शनसह दिला जाईल. फोनमध्ये मेटल फ्रेम दिली जाईल. फोनची जाडी ही 7.6mm असेल. फोनमध्ये नवीनतम लाँच Snapdragon 8s Gen 3 SoC चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 4700mAh बॅटरी दिली जाईल, जी 67W टर्बो फास्ट चार्ज सपोर्टसह येईल. जर आपण डिस्प्लेबद्दल बोलणे केले तर फोन विविड 1.5K 120Hz AMOLED डिस्प्ले सह येईल.
किंमत किती असले?
Xiaomi चा नवीन फोन Xiaomi 14 Civi भारतात जवळपास ३५ हजार रुपयांच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो. तुम्हाला सांगू इच्छितो की, चीनमध्ये हा फोन आधीच लाँच केला गेला आहे.