Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube Guidelines: YouTube ची नवीन मार्गदर्शक तत्व जारी; AI व्हिडीओसाठी बदलले नियम

अनेक टेक कंपन्या AI कंटेंटबाबत नवीन नियम आणत आहेत. टेक कंपन्यांनतर आता व्हिडीओ प्लॅटफॉर्म YouTube ने देखील AI व्हिडीओसाठी नवीन मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत. व्हिडीओ क्रिएटर्सना YouTube वर व्हिडीओ अपलोड करताना संबंधित व्हिडीओ AI चा वापर करून बनवला गेला आहे की नाही, हे घोषित करावं लागणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये व्हिडीओ बघताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2024 | 01:16 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी माहिती शोधायची असेल तर आपण Google किंवा YouTube वापर करतो. YouTube वर आपल्याला प्रत्येक विषयावरील व्हिडीओ पाहायला मिळतात. शिक्षण, खाद्यपदार्थ, व्यवसाय, शेअर मार्केट, यासांरख्या अनेक विषयांवरील व्हिडीओ आपण YouTube वर पाहू शकतो. YouTube वर आपण चित्रपट देखील पाहू शकतो. काही ब्लॉगर्स YouTube वर त्यांच्या दैनंदिन जीवणाचे व्हिडीओ अपलोड करत असतात. तर काहीजण गाणी, संगीत यासंबंधित व्हिडीओ अपलोड करतात. पण आता व्हिडीओ अपलोड करताना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. YouTube ने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या अंतर्गत कोणत्याही व्यक्तिला YouTube वर व्हिडीओ अपलोड करताना नियमांचे पालन करावं लागणार आहे.

या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, व्हिडीओ अपलोड करताना तुम्हाला घोषणा करावी लागणार आहे की संबंधित व्हिडीओ AI चा वापर करून तयार केला आहे की नाही. जर संबंधित व्हिडीओ AI चा वापर करून तयार करण्यात आला असेल तर त्यावर AI लेबल लावावं लागणार आहे. YouTube ने AI व्हिडिओसाठी आपली मार्गदर्शक तत्त्वे बदलली आहेत. अपलोड केलेला व्हिडिओ AI वापरून तयार केला आहे की नाही, हे युजर्सना सांगाव लागणार आहे. यानंतर YouTube कडून संबंधित व्हिडीओची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर जर त्या व्हिडीओमध्ये काही गैर आढळल्यास YouTube युजर्सना AI असलेले विशिष्ट व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती करू शकतो. तसेच तुम्ही एखादा व्हिडीओ पाहात असाल आणि तुम्हाला वाटले की तो व्हिडीओ AI चा वापर करून तयार करण्यात आला आहे, पण त्या व्हिडीओवर AI लेबल नसेल तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकता.

जेव्हा निवडणुका सुरू असतात किंवा हिंसाचार किंवा आरोग्य आणीबाणी किंवा सेलिब्रिटींशी संबंधित कोणतीही समस्या असो, अशा परिस्थितीत YouTube वरील व्हिडीओमध्ये पारदर्शकता असणं महत्त्वाचे आहे. अनेक व्हिडीओ AI चा वापर करून तयार केले जातात, पण त्यावर AI लेबल लावलं जात नाही. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे YouTube ने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे निवडणुका आणि आणीबाणीच्या काळात महत्त्वाची ठरणार आहेत.

व्हिडीओवर लावण्यात आलेल्या लेबलमुळे संबंधित व्हिडीओ AI चा वापर करून तयार केला आहे की नाही, हे समजेल. AI द्वारे तयार करण्यात आलेल्या व्हिडीओपासून दर्शकांची दिशाभूल होण्यापासून रोखणे, हा या मार्गदर्शक तत्वांचा प्रमुख उल्लेख आहे. यूट्यूबने म्हटले आहे की, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ अपलोड केल्यास पर्वा न करता तो प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल निर्मात्यांना 48 तासांचा वेळ मिळेल. यादरम्यान व्हिडिओ हटवावा लागेल किंवा तो ट्रिम किंवा ब्लर करावा लागेल. ही टूल्स फक्त YouTube स्टुडिओमध्ये उपलब्ध असतील. YouTube ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे येत्या काही महिन्यांत लागू केली जातील.

Web Title: Youtube guidelines youtubes new guidelines released changed rules for ai videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 01:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.