Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
टाईम मॅनेजमेंट फीचर यूजर्सना शॉर्ट्स फीड लिमिट शुन्य करण्याचा पर्याय ऑफर करते. यामुळे यूजर्स अखंड शॉर्ट्स फीडवर नियंत्रण ठेऊ शकतात. युट्यूबरील टाईम मॅनेजमेंट फीचरमुळे यूजर्सना स्क्रीन टाईम कमी करण्याचा आणि विनाकारण स्क्रोलिंगपासून सुटका मिळवण्याचा पर्याय मिळतो. तसेच, यूजर्स जेव्हा ही सेटिंग ऑन करतात तेव्हा त्यांना होम पेजवर शॉर्ट्स फीड दिसणार आहे. यामुळे तुमचे लक्ष शॉर्ट्स व्हिडीओकडे आकर्षित होणार नाही आणि तुम्ही विनाकारण स्क्रोलिंग थांबवू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
हे फीचर चालू केल्यानंतर तुम्हाला युट्यबवर शॉर्ट व्हिडीओ दिसणं पूर्णपणे बंद होणर नाही. युजर्स युट्यूब सर्च रिझल्ट पेजवर आणि सब्सक्रिप्शन फीडमध्ये शॉर्ट व्हिडीओ पाहू शकतात. तसेच शॉर्ट व्हिडीओच्या लिंकवर क्लिक करून देखील यूजर्स शॉर्ट व्हिडीओ पाहू शकणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, टाईम मॅनेजमेंट फीचर चालू केल्यानंतर देखील यूजर्सना शॉर्ट व्हिडीओ पाहण्याची इच्छा असेल तर पाहू शकतात.
Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा






