छत्रपती संभाजीनगरमधील बंजारा आरक्षण मेळाव्यात गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. समितीचा अहवाल केंद्राकडे पाठवून तातडीने एसटी आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याबाबत करण्यात आलेल्या मागणीची सखोल तपासणी करण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याlत आली.
तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करत जालन्यात देखील आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ज्या आमदारांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला आहे.