पंढरपूर-महाड या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील भोर तालुक्यातील कोंढरी पुलाजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
आरोप-प्रत्यारोपांमुळे आणि गोंधळामुळे भोर नगरपरिषदेच्या सभेचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. अखेर, महिला नगरसेविकांच्या तीव्र विरोधानंतर नगराध्यक्षांना लेखी माफीनामा सादर करावा लागला.
उत्रौली कानवडीच्या हद्दीतील परीटमाळ येथे ही दुर्घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक वीज कोसळल्याने शंकर किसन काटेकर (वय २२ रा. वडगाव डाळ ता. भोर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.