माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील ७२ मतदार प्रतिनिधी एकत्र आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्या उपस्थितीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच सत्कार समारंभ पार पडला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सत्ताकारणाला आता चांगलीच धार आली आहे. इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गतवर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी वार्षिक पतआराखड्यानुसार हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार ३७० कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.