31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पुणे: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी) नेहमीच शेतकऱ्यांना होणारे पीक कर्जवाटप सर्वाधिक होत आहे. यंदाच्या २०२५-२६ च्या पीक कर्जवाटपाचा जिल्हानिहाय वार्षिक पतआराखडा लवकरच राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत अंतिम होण्याची अपेक्षा आहे. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेने ठेवले असून, कर्जवाटपास नियमितपणे सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी व व्यापारी बँका, ग्रामीण बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले जाते. गतवर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी वार्षिक पतआराखड्यानुसार हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार ३७० कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पन्नास टक्के वाटा हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा होता. तर सुमारे साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज २०२५-२६ च्या वार्षिक पतआराखड्यासाठी लवकरच बैठक होऊन तो अंतिम केला जाणार असल्याची माहिती अग्रणी बँकेच्या सूत्रांकडून समजली.
दरम्यान, जिल्हा बँकेस गतवर्षीच्या खरीप २०२४-२५ मध्ये सुमारे २ हजार ४३ कोटी ४३ लाख रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर जिल्हा बँकेने प्रत्यक्षात २ लाख ३५ हजार ६५ शेतकऱ्यांना खरीप हंगामात २ हजार ३०९ कोटी ७८ लाख २६ हजार रुपयांइतके (११२.३३ टक्के) पीक कर्जवाटप पूर्ण केलेले होते.
देशात शेतकर्यांना सर्वाधिक पीक कर्जवाटप करण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे. यंदाच्या खरीप हंगामात एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने योग्य त्या सूचना सर्व शाखांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीकडून जिल्हा बँकेस देण्यात येणाऱ्या उद्दिष्टांहून अधिक पीक कर्जवाटप करण्यास आम्हाला नेहमीच यश आलेले आहे. यंदाही देण्यात येणाऱ्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप निश्चित केले जाईल. पावसाने वेळेवर अनुकूल साथ दिल्यास शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आदी निविष्ठांच्या खरेदी वेळेत करण्यासाठी पीक कर्ज तत्काळ देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. – प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, पुणे
Price Drop: लाँचिंगनंतर महिनाभरातच घसरली Samsung च्या या बजेट स्मार्टफोनची किंमत, कंपनीने के

