नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी भेट देऊन तातडीने एक महिन्याच्या पगाराची रक्कम देण्याचे कबूल करत उर्वरित सर्व थकित रक्कम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले.
नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे होर्डिंग तोडून टाकले. अनेक दिवसांच्या कालावधीनंतर नागरिकांच्या मागणीला यश आले आहे.
नगरपालिकेच्या प्रवेश द्वारावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठमोठाले फ्लेक्स, बॅनर लावले आहेत. संपूर्ण नगरपालिकेची इमारत झाकून गेली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत आयोजित केलेल्या इंडियन स्वच्छता लीगमध्ये सासवड नगरपरिषदेने देशात अव्वल क्रमांक पटकावला असून शनिवारी ( दि १ ) दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे पुरस्कार स्वीकारला.