विचित्र परंपरा! इथली लोक मृतदेहांच्या हाडांपासून सूप बनवून पितात, कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हाथ
जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिवासी समुदाय राहतात जे आजही काही असामान्य प्रथा पाळतात ज्या आपल्या समजण्यापलीकडे आहेत. यापैकी काही समुदायांमध्ये (Yanomami Tribe) नरभक्षणसारख्या काही प्रथा देखील आहेत. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही आदिवासी जमाती त्यांच्या मृत नातेवाईकांच्या अस्थी दळून त्याचे सूप (A Soup Made from Ashes) बनवतात आणि ते पितात. या प्रथा (Funeral Rituals) जरी तुम्हाला कितीही विचित्र वाटत असल्या तरी, या समुदायांसाठी या प्रथांना महत्त्वाचे धार्मिक किंवा सांस्कृतिक मूल्य आहे.
विचित्र परंपरा
यानोमनी आदिवासी समुदाय दक्षिण अमेरिकेतील घनदाट जंगलात, विशेषतः उत्तर ब्राझील आणि दक्षिण व्हेनेझुएलामध्ये राहतात. अमेझॉन रेनफॉरेस्टच्या काठावर राहून हे लोक अतिशय अनोखे जीवन जगतात. वास्तविक, त्यांच्या संस्कृतीत अनेक विचित्र प्रथा आहेत, त्यापैकी एक म्हणजे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे सूप बनवून पिणे.
या जमातीचे लोक साधारणपणे कोणतेही कपडे परिधान करत नाहीत. तसेच हे लोक कोणत्या घरात नाही तर मोकळ्या आकाशाखाली झोपतात. त्यांची जीवनशैली अतिशय साधी आहे. ते शिकार आणि शेतीवर अवलंबून आहेत. या जमातीचे विधी आणि चालीरीती देखील फार मनोरंजक आहेत, जे त्यांच्या खोल आध्यात्मिक मान्यतांना प्रतिबिंबित करतात.
हेदेखील वाचा – जगातील सर्वात भयानक जमात! इथे तरुण झाल्यावर महिलांचे ओठ कापले जातात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
हाडांच्या राखेपासून सूप तयार करतात
हे आदिवासी समुदाय त्यांच्या नातेवाईकांच्या निधनानंतर अत्यंत अनोखे अंत्यविधी करतात. या विधीमध्ये ते मृत व्यक्तीच्या हाडांच्या राखेपासून विशिष्ट पद्धतीने एक सूप तयार करतात आणि नंतर ते पितात. त्यांचा असा विश्वास आहे की या कृतीद्वारे ते मृत आत्म्याचे रक्षण करतात आणि त्याला शांती देतात. हा समाज मृत्यूला शेवटचा टप्पा मानत नाही, तर जीवनाच्या नव्या स्वरूपाची सुरुवात मानतात.
का बनवतात हाडांच्या राखेचा सूप?
हे आदिवासी समुदाय त्याच्या समाजातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे नसून विरोधी समाजातील मांत्रिकांनी पाठवलेल्या दुष्ट आत्म्यांचा हल्लामुळे झाल्याचे मानतात. त्यांचा असा विश्वास आहे की, मृतदेह जाळून आणि त्याची राख प्यायल्याने त्यांच्या प्रियजनांचे आत्मे पुन्हा जिवंत होतील. ही जमात सुमारे 200 ते 250 गावात पसरलेली आहे. हे आदिवासी पिढ्यानपिढ्या ही विचित्र परंपरा पुढे चालवत आहेत.
हेदेखील वाचा – Naked Village: स्त्रिया असो वा पुरुष, या गावात कोणीही कपडे परिधान करत नाहीत! कारण ऐकून थक्क व्हाल
आत्म्याला शांती देण्याची अनोखी पद्धत
यानोमानी आदिवासी समाज आपल्या मृत नातेवाईकांच्या मृतदेहाला अंत्यसंस्काराच्या अनोख्या प्रक्रियेद्वारे ठेवतात. ते मृत व्यक्तीचा मृतदेह पानांनी झाकून जवळच्या जंगलात जवळपास महिनाभर ठेवतात. या कालावधीनंतर, ते शवातून हाडे काढून टाकतात आणि त्यांना जाळतात. हाडे जाळल्यानंतर मिळणारी राख केळीमध्ये मिसळून एक खास प्रकारचा सूप बनवला जातो, जो समाजातील सर्व सदस्य मिळून प्यावा लागतो. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी मृत व्यक्तीच्या आत्म्याचा सन्मान करण्याचा आणि त्याला शांती प्रदान करण्याचा एक मार्ग आहे.