Bhangarh Fort Story: तांत्रिक शाप, भुताटकीच्या कथा... निर्जन भानगढ़ किल्ल्याचा भव्य इतिहास जाणून घ्या
भानगड शहर आणि त्याचा किल्ला जयपूरपासून 118 किमी अंतरावर आहे. हे देशातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. हा किल्ला 17 व्या शतकात आमेरचा मुघल सेनापती मानसिंग याचा धाकटा भाऊ राजा माधो सिंग याने बांधला होता. एकेकाळी भव्य मानली जाणारी ही जागा आता मात्र निर्जन झाली आहे. किल्ल्याच्या परिसरात हवेल्या, मंदिरे आणि निर्जन बाजारपेठेचे फक्त अवशेष उरले आहेत. संध्याकाळी सूर्यास्तानंतर येथे कोणीही जाण्याची हिंमत करत नाही.असे म्हणतात की, येथे रात्रीच्या अंधारात काही पैरानॉर्मल एक्टिविटीज होतात. मात्र असे असूनही हा सुंदर किल्ला पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येत असतात.
किल्ल्याची एक सर्वात विचित्र गोष्ट जी तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल. षी गोष्ट म्हणजे येथे बांधलेल्या एकाही घराला छत नाही. घराची संपूर्ण रचना बनली आहे, परंतु त्यापैकी एकालाही छप्पर नाही. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, घरांना छत नसल्यामुळे ती जेव्हाही बांधली जातात तेव्हा ती खाली पडतात. या जागेला बाळुनाथाचा शाप आहे हे इथल्या प्रत्येक मुलाला माहिती आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्कव्हरी प्लसवर रिलीज झालेल्या ‘एकांत’ या शोमध्ये इतिहासकार डॉ. रीमा आहुजाने संभाषण केले होते. त्या म्हणाल्या की, भानगढबद्दल इतक्या कथा आहेत की इतिहास कोठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे सांगणे सामान्यांना कठीण आहे. ही जागा इतिहासकारांसाठीही एक समस्या आहे. ती सांगते की, काही कथा खूप जुन्या आहेत. काही भुताच्या कथा आहेत. पूर्वीच्या काळी कोणीतरी राजा किंवा राजकुमारीला शाप दिला. रीमा सांगतात की, अनेकदा आपण पाहतो की लोक अशा गोष्टींबद्दल अधिक उत्सुकता वाटत असते. या कारणास्तव अशा कथा प्रचलित होत असतात. पण, या जागेचे संपूर्ण सत्य काय आहे, हे अद्याप कोणालाही माहिती नाही.
हेदेखील वाचा – Shravan Travel: लग्न जमण्यात अडचण येतेय? मग ‘या’ प्रसिद्ध शनिमंदिरांना एकदा भेट देऊन पहा
भानगडचे महाराज माधो सिंग हे संत बाळुनाथांचे भक्त होते. बाळुनाथने महाराजांनी तपश्चर्या करण्यासाठी महाराजांना एक गुहा बांधण्यास सांगितले. राजाने लगेच होकार देऊन गुहा बांधली. बाळुनाथ तपश्चर्या करण्यासाठी त्या गुहेत गेला. पण महाराज आणि संत बाळुनाथ यांच्यातील संबंध पाहून दरबारातील पुजाऱ्यांना हेवा वाटू लागला. पुजाऱ्यांनी दोघांना वेगळे करण्याची योजना आखली. त्यांनी एका मांजरीला मारून गुहेत फेकून दिले. दोन-तीन दिवसांनी मांजरीच्या मृत शरीरातून दुर्गंधी पसरू लागली तेव्हा पुजाऱ्यांनी राजाला संत बाळुनाथ गुहेत मरण पावल्याची माहिती दिली.
बाळुनाथ संत मरण पावल्याची खोटी माहिती मिळाल्यानंतर महाराजा माधोसिंग अतिशय दुःखी झाले. ते गुहेत गेले, पण वासामुळे त्यांना आत शिरता आले नाही. त्यांनतर त्यांनी गुहा बंद करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे संत बाळुनाथ यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे दिसले. यानंतर संत बाळुनाथ संतप्त झाले आणि त्यांनी भानगडचा संपूर्ण नाश व्हावा असा शाप राजाला दिला. यानंतर काय झाले हे कोणाला माहिती नाही. मात्र यानंतर भानगड पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, घरांची छप्परे पडली. तेव्हाही असेच होते आणि आताही येथील घरांवर छप्पर बांधले की ते कोसळते, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
आपली चूक लक्षात आल्यानंतर राजाने संताची समाधी बांधून दिली
किल्ल्यामागील जंगलात बाळुनाथाची समाधी आजही आहे
इतिहासकार या नावाच्या संताच्या अस्तित्वाची पुष्टी करत नाहीत
बालकनाथ नावाचे संत होते असे इतिहासकार मानतात
मात्र, तो कोणत्या कालखंडातील व कोणत्या क्षेत्रातील होता हे कळू शकलेले नाही
हा किल्ला जयपूर आणि अलवर शहरादरम्यान असणाऱ्या अभयारण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आला आहे. राजस्थानच्या बाहेरील शहरांमधून तुम्ही बस किंवा टॅक्सीने अलवरला पोहोचू शकता. हे ठिकाण दिल्लीपासून सुमारे 283 किमी आणि जयपूरपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. तुम्ही इथे भेट देत असाल तर अलवरमधील बाला किल्ला आणि अलवर सिटी पॅलेसला भेट द्यायला विसरू नका.