Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Divorse Temple: वर्षानुवर्षे बायकांना मुक्ती देत आहे हे मंदिर, कोर्टाऐवजी इथेच होतो निर्णय

जगात अनेक देवी-देवतांचे मंदिर आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का? जगात असेही एक अनोखे मंदिर आहे जिथे लग्नाला कंटाळलेल्या महिला आश्रय घेतात. या मंदिराला घटस्फोट म्हणून ओळखले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 26, 2024 | 09:39 AM
Divorse Temple: वर्षानुवर्षे बायकांना मुक्ती देत आहे हे मंदिर, कोर्टाऐवजी इथेच होतो निर्णय

Divorse Temple: वर्षानुवर्षे बायकांना मुक्ती देत आहे हे मंदिर, कोर्टाऐवजी इथेच होतो निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

जगात अनेक प्रकारची ठिकाणे आहेत. भारत हा आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक वस्तूंसाठी जगभर प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटन स्थळे त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखली जातात. अनेक ठिकाणांची स्वतःची धार्मिक श्रद्धा आहे. जर आपण मंदिरांबद्दल बोललो, तर आपल्याला भारतात अनेक देवी-देवतांची मंदिरे सापडतील, तर जगातही असंख्य मंदिरे आहेत. कंबोडिया, इंडोनेशिया इत्यादी देशांमध्ये हिंदू धर्माची अनेक मंदिरे आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या मंदिराविषयी माहिती सांगणार आहोत.

सामान्यतः भारतात, लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिरांना भेट देत असतात. लोक त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या पती आणि मुलांचे दीर्घायुष्य आणि इतर अनेक नवस आणि मागण्या घेऊन मंदिरात जातात. पण जगात एक मंदिर आहे जिथे लग्नामुळे त्रासलेल्या महिला जातात. हे मंदिर घटस्फोट मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात पतीकडून अत्याचार करणाऱ्या पत्नींना आश्रय दिला जातो आणि त्यांना या नात्यातून मुक्तता मिळते, असे म्हटले जाते.

हेदेखील वाचा – वंदे भारत ट्रेनमध्ये ‘वेटिंग तिकीट’ने प्रवास करता येतो का? काय आहेत नियम? सविस्तर जाणून घ्या

महिलांसाठी स्वर्ग

आम्ही बोलत आहोत जपानच्या मात्सुगाओका टोकेई-जी मंदिराबद्दल. याला घटस्फोटाचे मंदिर असेही म्हणतात. मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. असे म्हणतात की, त्या काळात जपानमध्ये फक्त पुरुषच त्यांच्या पत्नींना घटस्फोट देऊ शकत होते. अशा परिस्थितीत पतीकडून छळ झालेल्या महिलांसाठी हे मंदिर एक एकमेव आधार होते. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या प्रत्येक महिलेसाठी या मंदिराचे दरवाजे नेहमी खुले असायचे. येथे येऊन तिला पतीपासून स्वातंत्र्य मिळायचे.

हेदेखील वाचा – आता रेल्वे तिकिटासाठी 120 दिवसांआधी रिझर्वेशन करता येणार नाही, बुकिंग प्रणालीमधील नवीन बदल जाणून घ्या

असा आहे इतिहास

या अनोख्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. हे मंदिर 700वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर जपानच्या कामाकुरा शहरात स्थित आहे, हे मंदिर काकुसन नावाच्या ननने पती होजो तोकिमुनेसह बांधले होते. ती तिच्या पतीवर खूश नव्हती किंवा ती त्याला घटस्फोट देऊ शकत नव्हती. याच कारणामुळे ती या मंदिरात येऊन राहू लागली. यानंतर कोणत्याही महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायचा असेल तर ती तीन वर्षे या मंदिरात राहून ते करू शकते. नंतर ते दोन वर्षांपर्यंत कमी करण्यात आले. या मंदिरात फार पूर्वीपासून पुरुषांच्या प्रवेशावर बंदी होती. नंतर 1902 मध्ये जेव्हा एंगाकु-जी यांनी हे मंदिर ताब्यात घेतले तेव्हा या मंदिरावर एक पुरुष मठाधिपती नियुक्त करण्यात आला. यानंतर पुरुषांनी या मंदिरात प्रवेश करण्यास सुरुवात केली.

टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे. 

Web Title: Matsugaoka tokei ji divorce temple women breaks marriage easily living inside campus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 09:24 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.