Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झपाट्याने वाढतोय Sleep Tourism चा ट्रेंड! पर्यटनस्थळांचा आंनद घेण्यासाठी नाही, झोप घेण्यासाठी होतोय प्रवास

Sleep Tourism हा ट्रेंड सध्या झपाट्याने वाढत आहे. या ट्रेंडची वाढ पाहता आलिशान हॉटेल्समध्ये आरामदायी झोपेसाठी उशा, सुगंधी चादरी, ब्लॅकआउट पडदे, खोलीचे रंग इत्यादींचे नमुने विकसित केले गेले. स्लीप टुरिझम लोकांना त्यांच्या कामापासून आणि जबाबदाऱ्यांपासून दूर राहण्याची आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची संधी देते. सहलीच्या नियोजनात एकटे प्रवासी आणि जोडपे अशा ठिकाणांना प्राधान्य देत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2024 | 10:23 AM
झपाट्याने वाढतोय Sleep Tourism चा ट्रेंड! पर्यटनस्थळांचा आंनद घेण्यासाठी नाही, झोप घेण्यासाठी होतोय प्रवास (फोटो सौजन्य - pinterest)

झपाट्याने वाढतोय Sleep Tourism चा ट्रेंड! पर्यटनस्थळांचा आंनद घेण्यासाठी नाही, झोप घेण्यासाठी होतोय प्रवास (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीच्या जीवनात लोकांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी लोकं आजारी पडतात. बिझनेसमॅन, नेते, कलाकार, फिल्मस्टार, यासांरख्या अनेक लोकांना काहीवेळा त्यांच्या कुटूंबासाठी देखील वेळ मिळत नाही. त्यामुळे आता याच सर्व परिस्थितीत लोकं फिरायला जाऊन किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन आराम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत लोकं एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी किंवा त्या पर्यटनस्थाळाचा इतिहास जाऊन घेण्यासाठी त्या ठिकाणी जात होती. मात्र आता लोकं आपली झोप पूर्ण करण्यासाठी पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. या ट्रेंडला Sleep Tourism ट्रेंड असं नाव देण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा- परदेशात जायचंय पण पैशांचं टेन्शन आलंय? वापरा टॉप 10 मनी हॅक! होईल पैशांची बचत

एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या नेटवर्किंग हेडने त्याचा अनुभव सांगितला आहे. त्याने सांगितलं आहे की, एका दिवसात 25 तास कधी असतील याची वाट पाहत आहे, जेणेकरून मी माझा एक तास फक्त कुटुंब आणि विश्रांतीच्या नावावर देऊ शकेल. कंपनीकडून अनेक सुट्या आहेत, पण रजा घेण्याची संधी नाही. कसा तरी वेळ सापडला आणि आठवडाभरासाठी मी माझ्या कुटुंबासह गोव्याला गेलो, त्यामुळे तिथे फिरण्याऐवजी मी दिवसभर फक्त झोपायचे ठरवले. मित्रांनी मला टोमणे मारले की मी झोपायला इतके दूर गेलो, ज्याला माझे एकच उत्तर होते – ती माझी झोप होती. अगदी सुट्टीला जाऊन, थकून परत येणं आणि मग पुन्हा ऑफिस ते घर या चक्रात अडकणं यात काही मजा नाही.

हेदेखील वाचा- Best Tiger Parks: ही आहेत भारतातील 6 फेमस टायगर पार्क्स! मित्रांसोबत नक्की भेट द्या

भारतीय लोंक आता Sleep Tourism ट्रेंडच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहेत. तसेच हॉस्पिटॅलिटीच्या जगाने झोपेच्या पर्यटनाचा कल झपाट्याने वाढवला आहे. जिथे लोक प्रवास करण्यापेक्षा विश्रांती, पुरेशी झोप आणि जगाच्या गजबजाटासाठी रिचार्जिंगकडे अधिक झुकतात. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, कमी झोप आणि नैराश्य यांचा थेट आणि खोल संबंध आहे. एक काळ असा होता की दिवसभर हॉटेलच्या खोलीत झोपणे हा पर्यटकांचा वेळ वाया घालवणारा मानला जात होता. पण आता पर्यटनस्थळी जाऊन फिरण्यापेक्षा लोकं झोपेला अधिक महत्त्व देत आहेत. आयुर्वेदिक उपचारांपासून पौष्टिक आहारापर्यंत अनेक सुविधांसह Sleep Tourism चा ट्रेंड वेगाने वाढत आहे.

चांगली झोप ही एक लक्झरी गोष्ट बनत आहे आणि संपूर्ण जगासाठी ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत, भारतीय तसेच भारतात येणारे परदेशी पाहुणे येथील हॉटेल्समध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांद्वारे त्यांच्या विश्रांतीची बुकिंग करत आहेत. आयुर्वेद, योग, ध्यान, जलचिकित्सा, मसाज थेरपी यासारख्या सेवा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. ही पारंपारिक तंत्रे चांगल्या झोपेवर तसेच संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळेच येथे स्लीप टुरिझमची मागणी वाढत आहे.

केरळच्या गडगडणाऱ्या धबधब्यांपासून ते हिमालयाच्या निर्मळ खोऱ्यांपर्यंत तुम्हाला चांगली झोप हमखास मिळते, तर अनेक पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये उपलब्ध साउंडप्रूफ रूम्स, आयुर्वेदिक स्लीप थेरपी, अरोमाथेरपी यांसारख्या झोपेच्या सोयी आणि AI सहाय्यक बेड आणि हिप्नोथेरपिस्ट तुम्हाला शाही झोप देतात.

Web Title: Sleep tourism trend is increasing people are travelling for taking rest and not for visit of places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 10:23 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.