Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भुत! ऊन, वाराच काय भूकंप आणि आगीलाही मात देऊन उभी आहेत ‘ही’ प्राचीन शिवमंदीरं

तमिळनाडूतील तंजावर येथे असलेले प्राचीन पेरिया कोविल किंवा ब्रिहदीश्वरर शिव मंदिर हे युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले मंदिर अनेक अर्थांनी खास म्हणावे लागेल.

  • By Aparna Kad
Updated On: Feb 18, 2022 | 01:13 PM
अद्भुत! ऊन, वाराच काय भूकंप आणि आगीलाही मात देऊन उभी आहेत ‘ही’ प्राचीन शिवमंदीरं
Follow Us
Close
Follow Us:

चोल राज्यकर्ता राजाराज चोल पहिला याने बांधलेले हे मंदिर चौल राज्यवंशाच्या वैभवाचे साक्ष देते. या मंदिराचे वास्तूशिल्प एकमेवाद्वितीय असून कावेरी काठी बांधलेले हे मंदिर अनेक अर्थानी वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.

तंजावर. तमिळनाडूतील तंजावर येथे असलेले प्राचीन पेरिया कोविल किंवा ब्रिहदीश्वरर शिव मंदिर हे युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले मंदिर अनेक अर्थांनी खास म्हणावे लागेल.

उंच शिखराचे एकमेव मंदिर

देशातील हे सर्वात उंच शिखर असलेले मंदिर आहेच पण अप्रतिम वास्तूशिल्पासाठीही ते जगभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे सहा मोठे भूकंप व मोठी आग याला तोंड देऊन हे मंदिर आजही डौलाने भक्कमपणे उभे आहे. हे मंदिर १०१० सालात म्हणजे चोल राजवंशकाळात बांधले गेले आहे म्हणजे ते १००६ वर्षे जुने आहे.

सिमेंट-चुन्याचा वापर नाही

चोल राज्यकर्ता राजाराज चोल पहिला याने बांधलेले हे मंदिर चौल राज्यवंशाच्या वैभवाचे साक्ष देते. या मंदिराचे वास्तूशिल्प एकमेवाद्वितीय असून कावेरी काठी बांधलेले हे मंदिर अनेक अर्थानी वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. ग्रॅनाईट खडकात बांधलेल्या या मंदिराभोवती तटबंदी आहे. विशेष म्हणजे या परिसरात खडक नाहीत. त्यामुळे मंदिराच्या बांधकामासाठी आणलेले खडक किमान ५० किमीवरून आणले असावेत असे सांगितले जाते. मंदिराचा कळस २१६ फूट उंचीचा असून भारतातीलच नव्हे तर जगातील उंच कळसात एक आहे. मंदिर बांधताना कुठेही सिमेंट चुन्याचा वापर केला गेलेला नाही. इंटरलॉकिक पद्धतीने दगडी चिरे बसविले गेले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेला नंदी १६ फूट लांब, १३ फूट उंचीचा असून एकाच खडकातून कोरलेला आहे.

प्रचंड शिवलिंग

मंदिरातील शिवलिंगही महाप्रचंड आकाराचे आहे. त्यांची उंची ३.७ मीटर इतकी आहे. शिवलिंगाचे पूर्ण दर्शन दोन मजल्यातून घेता येते. मंदिरात हजारो मूर्ती कोरल्या गेलेल्या आहेत. मंदिर बांधणारा राजा राजाराज हा शिवभक्त होता तसेच महापराक्रमीही होता. संपूर्ण दक्षिण भारतावरच नव्हे तर श्रीलंका, मलाया, मालदीव पर्यंत त्याचे राज्य पसरलेले होते. श्रीलंकेचा राज्याभिषेक त्याला केला गेला होता. त्याला स्वप्तात शिवाने मंदिर बांधण्याचे आदेश दिले व त्यानुसार हे मंदिर बांधले गेले असे सांगितले जाते. या मंदिरात वेळोवेळी करावयाच्या पूजा, देवाला घालायचे पोशाख, दागदागिने, वापरायची फुले या संदर्भात अनेक नियम राजाने केले होते व ते येथील दगडांत कोरलेले आहेत. चोल घराण्याने अनेक मंदिरे कावेरीकाठी बांधली मात्र हे मंदिर त्या सर्वात खास आहे. येथे पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते.

Web Title: These oldest shiv temples are tough in structures earthquakes could not destroy them nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2022 | 01:03 PM

Topics:  

  • shiv temples

संबंधित बातम्या

देशाला चिरत अगदी सरळ रेषेत मधोमध बांधण्यात आली आहेत ही ७ अद्भुत मंदिरं!  हा फक्त योगायोग की अलौकिक संकेत?
1

देशाला चिरत अगदी सरळ रेषेत मधोमध बांधण्यात आली आहेत ही ७ अद्भुत मंदिरं! हा फक्त योगायोग की अलौकिक संकेत?

Shravan 2025 : श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करायचं असेल तर देशातील या प्राचीन मंदिरांना जाऊन भेट द्या; सर्व इच्छा होतील पूर्ण
2

Shravan 2025 : श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करायचं असेल तर देशातील या प्राचीन मंदिरांना जाऊन भेट द्या; सर्व इच्छा होतील पूर्ण

कहाणी आहे ‘या’ हजार वर्ष जुन्या शिव मंदिराची, जे बनले आहे थायलंड-कंबोडियामधील संघर्षाचा केंद्रबिंदू
3

कहाणी आहे ‘या’ हजार वर्ष जुन्या शिव मंदिराची, जे बनले आहे थायलंड-कंबोडियामधील संघर्षाचा केंद्रबिंदू

150 वर्ष जुनं हे शिवमंदिर पाण्याखाली वसलंय, महादेव दरवर्षी फक्त शिवरात्रीलाच देतात दर्शन!
4

150 वर्ष जुनं हे शिवमंदिर पाण्याखाली वसलंय, महादेव दरवर्षी फक्त शिवरात्रीलाच देतात दर्शन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.