Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांना रस्त्याच्या कडेला सोडून पालक जातात डेटवर! ‘या’ देशातील विचित्र परंपरा ऐकूण आश्चर्य वाटेल

जगातील अनेक देशांमध्ये आई-वडिलांच्या प्रेमात गुरफटलेली मुले तुम्ही पाहिली असतील. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की असा एक देश आहे की जिथे पालक आपल्या लहान मुलांना मोकळ्या रस्त्यावर स्ट्रोलरमध्ये झोपवतात आणि नंतर रोमँटिक डेटला जातात? असं दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या विचित्र प्रथेमध्ये मुले स्ट्रोलरमध्ये आरामात झोपतात, तर त्यांचे पालक कोणतीही चिंता न करता चांगले क्षण घालवण्यासाठी बाहेर जातात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2024 | 10:32 AM
मुलांना रस्त्याच्या कडेला सोडून पालक जातात डेटवर! 'या' देशातील विचित्र परंपरा ऐकूण आश्चर्य वाटेल

मुलांना रस्त्याच्या कडेला सोडून पालक जातात डेटवर! 'या' देशातील विचित्र परंपरा ऐकूण आश्चर्य वाटेल

Follow Us
Close
Follow Us:

जरा कल्पना करा, तुम्ही अशा देशात आहात जिथे मुलं मोकळ्या रस्त्यावर स्ट्रोलर्समध्ये झोपली आहेत आणि त्यांचे पालक एका रोमँटिक डेटवर गेले आहेत. असं दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्या मनात अनेक प्रश्न देखील निर्माण होतील. पण असा एक देश आहे जिथे पालक आपल्या मुलांना रस्त्याच्या कडेला स्ट्रोलर्समध्ये ठेऊन डेटवर जातात. आम्ही डेन्मार्कबद्दल बोलत आहोत जिथे असे दृश्य दिसणं अगदी सामान्य आहे. ही डेन्मार्कमधली प्रथा आहे. ही प्रथा ऐकूण आपल्याला जरी आश्चर्य वाटत असलं तरी तेथील नागरिकांसाठी अगदी सामान्य आहे.

हेदेखील वाचा- बंगालमध्ये न जाता दुर्गा पूजा अनुभवण्याची इच्छा आहे? तर दिल्लीतील या प्रसिद्ध मंडळांना नक्की भेट द्या

डेन्मार्कमधील या विचित्र प्रथेमध्ये मुले स्ट्रोलरमध्ये आरामात झोपतात, तर त्यांचे पालक कोणतीही चिंता न करता चांगले क्षण घालवण्यासाठी बाहेर जातात. या काळात ते रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकतात किंवा प्रवासाचा आनंद देखील घेऊ शकतात. या विचित्र परंपरेमागील कारण आणि त्याच्याशी संबंधित मनोरंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)

मुले मोकळ्या आकाशाखाली झोपतात

युरोपातील सुंदर देश डेन्मार्कमध्ये एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. इथल्या लोकांना मोकळ्या आकाशाखाली आपल्या मुलांना स्ट्रोलरमध्ये झोपवून काही क्षणांचा आनंद लुटायला आवडते. डेन्मार्कमध्ये अगदी सहज पाहायला मिळणार दृष्य म्हणजे लहान मुले रस्त्याच्या कडेला स्ट्रोलर्समध्ये आरामात झोपली आहेत, आणि त्यांचे पालक जवळच्या कॅफेमध्ये कॉफीचा आनंद घेत आहेत. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु डेन्मार्कमध्ये ही पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. हिवाळा कितीही कडक असला तरी आपल्या मुलांना मोकळ्या हवेत झोपवण्यावर येथील लोकांचा विश्वास आहे.

पर्यटकही आश्चर्यचकित राहतात

डेन्मार्कमध्ये लहान मुलांना रस्त्यावर झोपवण्याची पद्धत आहे. कोपनहेगनच्या रस्त्यांवर स्ट्रोलर्समध्ये झोपलेली मुले पाहून परदेशी पर्यटकांना अनेकदा आश्चर्य वाटते. ताजी हवा लहान मुलांसाठी फायदेशीर आहे, असे येथील लोकांचे मत आहे, त्यामुळे मुलांना उघड्यावर झोपवण्यास त्यांना अजिबात संकोच वाटत नाही.

हेदेखील वाचा- Hotel Check-out Mistakes: हुशार लोकंही हॉटेल चेक आऊटवेळी करतात या 6 चुका

मुलांना रस्त्याच्या कडेला झोपवण्याचे कारण काय?

डेन्मार्कचे लोक जेवणानंतर आपल्या मुलांना स्ट्रोलरमध्ये झोपवतात आणि रस्त्याच्या कडेला सोडतात, पण प्रश्न असा आहे की डेन्मार्कचे लोक आपल्या मुलांना रस्त्याच्या कडेला झोपवण्यावर विश्वास का ठेवतात? वास्तविक, या देशात 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोकळ्या हवेत झोपवण्याची प्रथा खूप जुनी आहे. असे मानले जाते की ताजी हवा मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळते.

मुलांचे अपहरण होण्याची भीती नाही

डेन्मार्कमधील सुईणी आणि बाळ परिचारिका देखील पालकांना त्यांच्या बाळांना मोकळ्या हवेत झोपवण्याचा सल्ला देतात. येथील लोकांचा असा विश्वास आहे की मुलांना ताज्या हवेत वेळ घालवल्याने अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात, मुलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्ट्रॉलरमध्ये उबदार ब्लँकेट ठेवल्या जातात. विशेष म्हणजे पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत खूप दक्ष असतात. ते स्ट्रॉलरमध्ये बेबी मॉनिटर बसवतात जेणेकरून ते मुलावर लक्ष ठेवू शकतील. ही परंपरा बरीच जुनी असल्याने येथे लहान मुलांचे अपहरण होण्याची भीती कमी आहे.

Web Title: Unique tradition in denmark parents leave their sleeping baby on the side of the road and go on romantic date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 10:32 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.