परफेक्ट ऑफबीट बीच व्हेकेशनसाठी भारतातील 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या; प्रवास होईल रोमांचकारी
ऑक्टोबर महिना प्रवासासाठी सर्वोत्तम महिना मानला जातो. या कालावधीत हवामान देखील प्रवासासाठी चांगले असते. तुम्हालाही तुमची सुट्टी समुद्र किनाऱ्यांवर घालवायची असेल तर हा सर्वोत्तम काळ आहे. आपल्या भारताला अनेक विस्तीर्ण आणि अनेक सुंदर समुद्रकिनारे लाभलेले आहेत. मात्र गजबजाटापासून दूर तुम्हाला थोडी शांती हवी असेल तर भारतात काही ऑफबीट ठिकाणेही आहेत जी शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देण्यासाठी उत्कृष्ट आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारतातील 5 ऑफबीट बीचेस जे तुम्हाला रोमांचकारी अनुभव देतील.
रोमांचकारी अनुभव देणारी काही ऑफबीट ठिकाणे
गोकर्ण, कर्नाटक – हा कर्नाटक राज्यातील शांत समुद्रकिनारा आहे. प्रसिद्ध ओम बीच आणि कुडले बीच येथे असलेल्या विविध पाण्याच्या खेळांमुळे ते साहस प्रेमींसाठी लोकप्रिय आहे. ऑक्टोबरमध्ये या ठिकाणाला भेट दिल्यास समुद्राच्या शांत लाटांचा आणि स्वच्छ किनाऱ्यांचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. याशिवाय, पॅराडाईज बीचवरील अप्रतिम सूर्यास्ताचा अनुभव देखील अविस्मरणीय ठरेल.
दीव, गुजरात
दीव हे त्याच्या पोर्तुगीज वारसा आणि शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. ऑक्टोबरमध्ये येथे गर्दी कमी असते, ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणाच्या सौंदर्याचा शांतपणे आनंद घेता येईल. निळे पाणी, स्वच्छ किनारे आणि शांत वातावरण यामुळे दीव एक परिपूर्ण बीच व्हेकेशनसाठी उत्तम पर्याय आहे.
मांडवी, गुजरात
गुजरातमधील मांडवी बीच हे आणखी एक ऑफबीट ठिकाण आहे. या बीचवर तुम्ही शांत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकता. ऑक्टोबर महिन्यात येथे विजय विलास पॅलेस आणि मांडवीच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. पारंपारिक जहाजबांधणी आणि स्थानीक कला पाहण्याचा अनुभव देखील तुमच्यासाठी अनोखा ठरेल.
चांदीपूर, ओडिशा
चांदीपूर हा ओडिशातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. समुद्र किनाऱ्यावर लांब पायवाटांवर चालत तुम्ही त्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता. येथे समुद्राचे पाणी अदृश्य होण्याची विचित्र घटना देखील अनुभवता येते, ज्यामुळे हे ठिकाण आणखी खास ठरते.
बटरफ्लाय बीच, गोवा
गोव्यातील बटरफ्लाय बीच हे एक लपलेले ऑफबीट ठिकाण आहे. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला बोटिने किंवा जंगलातून ट्रेक करून यावे लागते. क्रिस्टल स्वच्छ पाणी आणि आसपासच्या हिरवाईमुळे हा किनारा अत्यंत आकर्षक वाटतो. ऑक्टोबर महिन्यात येथे गर्दी नसते, ज्यामुळे तुम्ही शांततेत वेळ घालवू शकता.
हे सर्व ठिकाणे एकाच वेळी साहस, शांतता, आणि निसर्गाच्या सान्निध्यात आराम देतात, ज्यामुळे तुमची समुद्रकिनारी सुट्टी अधिक रोमांचकारी होईल.