ठाणे ते उल्हासनगर लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या 26 वर्षीय महिलेची दिव्यांगांच्या डब्ब्यात छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 2 डिसेंबर रोजी रात्री साधारण 8.15 च्या सुमारास घडली. फिर्यादी महिला उल्हासनगर येथील रहिवासी असून नोकरीसाठी ठाण्यातून परतत होती. डोंबिवली स्टेशन सुटल्यानंतर आरोपी अनुप सुरेंद्र सिंग आणि अभिलाष अर्जुन नायर यांनी फिर्यादीसोबत दिव्यांग पासावरून वाद घातला. वाद वाढताच दोन्ही आरोपी महिलेच्या अंगावर धावून गेले आणि तिचा हात पकडत विनयभंग केला, असा आरोप महिलेने केला आहे.