राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाविरोधात आणि इतर धोरणात्मक मागण्यांसाठी ३ दिवसांचा संप पुकारला आहे. राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने सुरू केलेल्या या संपात सुमारे सात प्रमुख संघटनांनी सहभाग नोंदवला आहे.संपाच्या माध्यमातून कर्मचारी महावितरण कंपनीच्या उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविणे, समांतर वीज वितरण परवाना देणे, TBCB प्रकल्पांमध्ये भांडवलदारांना देणे आणि कंपनीच्या IPO लिस्टिंगसह इतर प्रलंबित धोरणांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. या संपात महेश चाबुकस्वार, धीरज गायकवाड, राजेंद्र घोरपडे, सुशील तायडे, गणेश कुंभारे आणि इतर अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.